छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघातील महायुतीमधील भाजपचे २० उमेदवार जाहीर झाले असून नामनिर्देशन पत्र माघारीपूर्वी राजकीय पटलावर परतूर व हिंगोली हे दोन मतदारसंघ वगळता अन्यत्र भाजपचा लढत ‘ मशाल’ चिन्ह टाळून असल्याचे दिसून येत आहे. भाजपची नव्या यादीमध्ये लातूर शहर मतदारसंघातून अर्चना पाटील चाकूरकर, आष्टीमधून सुरेश धस, देगलूरमधून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मराठवाड्यात भाजपने या पूर्वी २६ जागांवर उमेवार दिले होते. या वेळी गेवराई, माजलगाव, परळी हे मतदारसंघ भाजपच्या यादीतून वजा झाले आहेत. गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे यांना भाजपने पुरस्कृत उमेदवार असल्याची घोषणा सोमवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार जाहीर होणे सोमवारी सकाळपर्यंत बाकी होते. यामध्ये कन्नड, घनसावंगी, गंगाखेड, बीड, आष्टी, देगलूर, लातूर शहर या मतदारसंघाचा समावेश होता. यामधील आष्टी, देगलूर, लातूर शहर या मतदारसंघातील उमेदवार भाजपने जाहीर केले. त्यामुळे उर्वरित तीन मतदारसंघातील उमेदवार शिवसेना (एकनाथ शिंदे) किंवा राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाकडून होईल, असे सांगण्यात येत आहेत. भाजपने दिलेल्या उमेदवारीमध्ये अनुराधा चव्हाण, श्रीजया चव्हाण हे नवे चेहरे दिले. कॉग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या जितेश अंतापूरकर यांनाही सोमवारी देगलूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. परळीची हक्काची जागा भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षास दिली. गेवराई व माजलगाव या भाजपच्या जागाही या वेळी वजा झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा ; Congress struggle : उमेदवार नाव नोंदणीसाठी उरला अवघा एक दिवस, काँग्रेसचा जागा निश्चितींसाठी संघर्ष, नाराजांची नाराजी घालवण्याचं आव्हान

मराठवाड्यातून भाजपचे २० उमेदवार

अतुल सावे – औरंगाबाद (पूर्व ), अनुराधा चव्हाण-फुलंब्री, प्रशांत बंब-गंगापूर, नारायण कुचे-बदनापूर, बबनराव लोणीकर-परतूर, संतोष दानवे-भोकरदन, नमिता मुंदडा-केज, सुरेश धस-आष्टी, तुषार राठोड-मुखेड, श्रीजया चव्हाण-भोकर, राजेश पवार-नायगाव, जितेश अंतापूरकर-देगलूर, भीमराव केराम-किनवट, मेघना बोर्डीकर-जिंतूर, राणा जगजीत सिंह पाटील-तुळजापूर, अभिमन्यू पवार-औसा, अर्चना पाटील चाकूरकर-लातूर शहर, रमेश कराड-लातूर ग्रामीण, तानाजी मुटकुळे-हिंगोली, संभाजी पाटील निलंगेकर-निलंगा.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada assembly elections 2024 bjp vs shivsena thackeray faction fight on only two seats print politics news css