लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आरोप-प्रत्यारोप, आश्वासनांची खैरात आणि विविध प्रकारच्या मागण्या आणि अपेक्षांची यादी मांडलेली दिसून येते. महिलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे आणि त्यांना अधिक सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे, हा मुद्दा जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये दिसून येतो, त्यात काही गैरही नाही. मात्र, पुरुषांच्या हक्कांचे काय? असा प्रश्न उपस्थित करत भारतात एक संपूर्ण राजकीय पक्षच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. ‘मेरा अधिकार राष्ट्रीय दल’ अर्थात ‘मर्द पार्टी’ (MARD Party) असे या पक्षाचे नाव आहे. हा पक्ष फक्त आणि फक्त पुरुषांना अधिकार मिळवून देण्यासाठी राजकीय आखाड्यात उतरलेला आहे.

हेही वाचा : राम मंदिरानंतर ‘कृष्ण मंदिरा’साठी भाजपाला हव्या चारशेपार जागा?

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला

मर्द पार्टीची स्थापना आणि गरज

मर्द पार्टीची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली आहे. हुंडाबंदी कायदा आणि घरगुती हिंसाचार संरक्षण कायद्यामुळे अनेक कायदेशीर अडचणींना तोंड देत असलेल्या पुरुषांनी एकत्र येत या पक्षाची स्थापना केली आहे. कपिल मोहन चौधरी या पक्षाचे संस्थापक असून १९९९ पासून ते हुंडा प्रकरणामुळे कायदेशीर कचाट्यात अडकले आहेत. ते म्हणाले की, “माझ्या पहिल्या पत्नीपासून मला दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर या दोन्हीही मुलांचा ताबा तिच्याकडे गेला. त्यानंतर मला हुंडा आणि घरगुती हिंसाचाराच्या खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आले. लखनौमध्ये हा खटला लढवत असताना अशाच समस्यांमुळे त्रस्त असलेल्या इतरही अनेक पत्नी पीडितांशी माझी भेट झाली.” २०११ मध्ये पुनर्विवाह केलेल्या चौधरी यांनी पुढे म्हटले की, “मी पुरुषांच्या समस्यांना आवाज मिळवून देण्यासाठी हा पक्ष स्थापन केला आहे.” ‘मर्द को भी दर्द होता है!’ असे या पक्षाचे ब्रीदवाक्य आहे.

हा पक्ष निवडणूक लढवतोय का?

होय! हा पक्ष निवडणूक लढवतो. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही त्यांची पहिली निवडणूक नसून याआधीही त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. २००९ साली पक्ष स्थापन झाल्यापासून आतापर्यंत या पक्षाने सात निवडणुका लढवल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, मर्द पार्टीने वाराणसी आणि लखनौ मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते. त्यानंतर २०२० मध्ये मर्द पार्टीने बंगरमाऊ आणि बरेली, लखनौ उत्तर आणि बक्षी का तालाब मतदारसंघामधून विधानसभेची पोटनिवडणूकही लढवली होती.

मात्र, या सगळ्या निवडणुकांमध्ये मर्द पार्टीच्या उमेदवारांचा जोरदार पराभव झाला आहे. अर्थातच, या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. असे असूनही मर्द पार्टीने आजवर कधीच माघार घेतलेली नाही. या लोकसभा निवडणुकीमध्येही मर्द पार्टीने अनेक उमेदवार उभे केले आहेत. मर्द पार्टी लखनौ, गोरखपूर आणि रांची मतदारसंघामधून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवत आहे.

काय आहे मर्द पार्टीचा जाहीरनामा?

प्रत्येक राजकीय पक्षाचा जाहीरनामा असतो. मर्द पार्टीनेही सत्तेवर येऊन आपल्याला कोणते बदल करायचे आहेत, याचे आश्वासन देणारा आणि आपली ध्येयधोरणे मांडणारा जाहीरनामा काढला आहे. या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पुरुषांचे हक्क आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातूनच या जाहीरनाम्याची निर्मिती केली आहे. “MANifesto: A real MANifesto for MAN” असे या जाहीरनाम्याचे नाव आहे. त्यांनी ‘MANifesto’ मधील ‘MAN’ या शब्दाला अधिक ठळक करत आपले उद्दिष्ट जाहीरनाम्याच्या नावामधूनच स्पष्ट केले आहे. सत्तेवर आल्यास ‘पुरुष कल्याण मंत्रालया’ची निर्मिती आणि ‘राष्ट्रीय पुरुष आयोगा’ची स्थापना करणार असल्याचे त्यांचे प्रमुख आश्वासन आहे. मर्द पार्टीला ‘पुरुष सुरक्षा विधेयक’ही संमत करायचे आहे. महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा वापर पुरुषांवर अन्याय करण्यासाठी होऊ नये, यासाठी या विधेयकाची गरज असल्याचे मर्द पार्टीचे म्हणणे आहे.

हेही वाचा : भाजपा हरियाणात एका मध्ययुगीन मुस्लीम राजाचा उदो-उदो का करत आहे?

या पार्टीमध्ये स्त्रियांना कितपत स्थान आहे?

मर्द पार्टीचे प्रमुख कपिल मोहन चौधरी म्हणाले की, महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन करणे नव्हे तर पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करणे हे पक्षाचे मुख्य ध्येय आहे. मात्र, या पक्षाने समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या काही पोस्ट्सवरून वेगळीच प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.

मर्द पार्टीने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “फेमिनीझम (स्त्रीवाद) नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. ही एक मानसिक विकृती असून कीव आणणारी विचारसरणी आहे. कुटुंबांना उद्ध्वस्त करण्यासाठीच अशा प्रकारच्या राजकारणाला खतपाणी घातले जाते. तुम्ही या मताशी सहमत आहात का?”

“लग्नानंतर पुरुषाला नोकरी सोडावी लागते की स्त्रीला?” या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पक्षाच्या एका समर्थकाने म्हटले की, “स्त्रियांना सोडावी लागते, पण आता त्या नोकरी सोडायला तयार होत नाहीत. त्यामुळे घरी चहा कोण तयार करणार यावरून भांडणे होत आहेत. जर स्त्रियांना घर सांभाळता येत नसेल तर ही एक मोठी समस्या आहे. कारण पुरुषाला कामावर गेल्यावर तिथे बरेच काही सहन करावे लागत असते.”

Story img Loader