काँग्रेस पक्षाचे ८५ राष्ट्रीय महाअधिवेशन छत्तीसगडच्या रायपूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनासाठी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातींमध्ये काँग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांचे फोटो छापण्यात आले. यामध्ये महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते पी.व्ही. नरसिंहराव यांच्यापर्यंतच्या अनेक नेत्यांचा समावेश होता. पण स्वातंत्र्यसैनिक, भारताचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम मौलाना आझाद यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेसवर बरीच टीका झाली. काँग्रेसने देखील आपली ही चूक मान्य केली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी यांनी सांगितले की, आमच्याकडून अक्षम्य चूक झालेली आहे. या चुकीची जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्यात येईल.

रायपूरच्या अधिवेशनात अल्पसंख्यांकाना जवळ करण्याकरिता अनेक ठराव संमत केले जात असातना अबुल कलाम आझाद यांच्या फोटोवरुन सुरु झालेला वाद काँग्रेसला परवडणारा नव्हता. त्यामुळे काँग्रेसने यावर लगेचच माफी मागून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सय्यद इरफान हबीब यांनी काँग्रेसच्या जाहीरातीमधून मौलाना आझाद यांना बाजूला केल्याची बाब सर्वात आधी निदर्शनास आणून दिली. सय्यद हबीब हे लेखक, इतिहासकार असून त्यांनी नुकतेच “मौलाना आझाद: अ लाइफ, अ बायोग्राफी” या पुस्तकाचे लिखाण केले आहे.

Image Of Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

हे वाचा >> Congress Resolution: ओबीसी मंत्रालय ते जातनिहाय जनगणना, खासगी क्षेत्रात मागासवर्गीयांना जागा; काँग्रेसने सुरु केली २०२४ ची तयारी

हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न करणारे नेते

अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. १९१२ साली त्यांनी अल-हिलाल नावाचे उर्दू साप्ताहिक सुरु केले. ब्रिटिश संसदेने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी मंजूर केलेल्या मोर्ले-मिंटो सामंजस्य कराराचे अबुल कलाम आझाद यांनी समर्थन केले होते. १९१५ मध्ये आझाद यांनी अल-बाघाव नावाचे साप्ताहिक सुरू केले. परंतु ते फारसे चालले नाही. १९१६ मध्ये त्यावर बंदी घालण्यात आली. चार वर्षांनंतर आझाद यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

सर्वात कमी वयात अध्यक्ष झाले

१९२३ साली वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आझाद काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. एवढ्या कमी वयात हे पद भूषविणारे ते एकमेव नेते आहेत. सय्यद हबीब म्हणतात की, १९२३ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एक गट निवडणुकांच्या बाजूने होता, तर दुसरा गट महात्मा गांधी यांच्या बाजूने. ते निवडणूक लढविण्याच्या विरोधात होते. दोन्ही गटांना असे वाटत होते की, मौलाना आझादच हा प्रश्न सोडवू शकतील. ते वयाने लहान असले तरी अनेकांचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यावेळी काँग्रेस फुटीच्या मार्गावर असताना आझाद यांनी तो प्रश्न सोडविला आणि काँग्रेस आणखी मजबूत झाली.

हे वाचा >> काँग्रेसचा जुन्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न; रायपूर अधिवेशनात मागासवर्गीयांसाठी विविध योजनांच्या ठरावाची घोषणा

अबुल कलाम आझाद यांच्या १९२३ च्या पहिल्या अध्यक्षीय भाषणाबद्दल लेखक अशगर अली इंजिनिअर यांनी १९८८ मध्ये इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये लिहिले आहे. “अबुल कलाम यांच्या अध्यक्षीय भाषणाचा बराचसा भाग हिंदू-मुस्लिम ऐक्यावर भर देत होता. ते म्हणाले की, हिंदू मुस्लिम ऐक्य हे त्यांना भारताच्या स्वातंत्र्यापेक्षाही अधिक प्रिय आहे.” हिंदू-मुस्लिम ऐक्यावर आझाद आयुष्यभर कायम राहिले, अशी आठवण हबीब यांनी सांगितली.

‘चले जाव’ चळवळीत पक्षाचे नेतृत्व केले

आझाद यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली, तो काळ (१९४०-४६) देखील कठीण होता. रामगढ येथे झालेल्या या अधिवेशनात दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना मदत करायची की नाही? तसेच संपुर्ण स्वातंत्र्याच्या विषयावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. त्यानंतर आझाद यांनी १९४२ मध्ये क्रिप्स मिशनसोबत संपूर्ण सत्ता हस्तांतरणाच्या वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच १९४२ साली सुरु झालेले भारत छोडो आंदोलन आणि १९४५ साली शिमला परिषदेत व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांच्यासोबत स्वतंत्र मतदारसंघाच्या वेव्हेल योजनेवर चर्चा करण्यात आझाद यांनी पक्षाचे नेतृत्व केले. १९४२ ते १९४५ या काळात आझाद यांना महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमवेत अहमदनगर किल्ल्यावर कैद करण्यात आले होते.

फाळणीबद्दल अबुल कलाम आझाद यांनी आपल्या चरित्रामध्ये लिखाण केले आहे. ते लिहितात, “फाळणी ही भारतासाठी एक शोकांतिका होती. फाळणी टाळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आम्ही अपयशी ठरलो. आता पर्याय नव्हता. जर स्वातंत्र्य हवे असेल तर भारताच्या फाळणीची मागणी मान्य केली पाहीजे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, राष्ट्र एक आहे आणि त्याचे सांस्कृतिक जीवन एक आहे आणि एक राहिल. देशाचे विभाजन होत असल्यामुळे राजकिदृष्ट्या आपण अपयशी ठरलो आहोत. आपला पराभव आपण स्वीकारायला हवा. पण त्याचबरोबर आपल्या संस्कृतीमध्ये फूट पडणार नाही. याची काळजी आपण घेतली पाहीजे.”

इस्लामची चिकित्सा करण्याबाबत वडीलांशी मतभेद

हबीब म्हणतात, काँग्रेसमध्ये मतभेद आणि विरोधाभास असलेले विचार होते. त्यासोबतच अनेक मोठ्या उंचीचे नेते पक्षात होते. आझाद यांच्या ‘तुलनात्मक दृष्टीकोन’ आणि ‘संमिश्र राष्ट्रवाद’ याबाबत बोलत असताना हबीब यांनी सांगितले की, मौलाना आझाद यांना इस्लामचा वारसा त्यांच्या वडीलांकडून मिळाला. वडीलांची इस्लामवर गाढ श्रद्धा होती, पण मौलाना आपल्या वडीलांशी असहमत होते. त्यांचे म्हणणे होते की, चिकित्सा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारू नये. आझाद यांना सर्व धर्मामध्ये समानता असावी, असे वाटायचे.

अनेक इतिहासकार आझाद यांच्या शिक्षण मंत्री पार पाडलेल्या कारकिर्दीविषयी (१९४७ ते १९५८) देखील बोलतात. याच काळात आयआयटी आणि आयआयएम सारख्या उच्च शैक्षणिक संस्थांचा पाया घातला गेला. आपल्या मंत्रीपदाच्या शेवटच्या काळात आझाद हे शिक्षणासाठी अर्थसंकल्पातील तरतूद एक कोटींवरुन ३० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात यशस्वी झाले होते. प्रौढ साक्षरता हा गंभीर विषय आझाद यांनी मानला होता, असे हबीब सांगात.

Story img Loader