मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाज विरोधात गेल्याचा महायुतीला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लीम समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. मदरशांतील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : अंशत: अनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदान मंजूर

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत राज्यातील मदरसांमध्ये पारंपरिक, धार्मिक शिक्षणाबरोबरच गणित, विज्ञान, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दूचे शिक्षण देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. सध्या डी. एड. शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येत असून ते १६ हजार रुपये करण्यात येईल. माध्यमिकचे विषय शिकवणाऱ्या बी.ए. बी.एड., बी.एस्सी-बी.एड. शिक्षकांचे मानधन आठ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये करण्यात येईल.