पिंपरी : मावळमधील सहाही विधानसभा मतदारसंघांत घटक पक्षांचे आमदार, महापालिका, नगरपरिषदांवर सत्ता राहिल्याने सुरुवातीला महायुतीला सोपी वाटणारी निवडणूक आव्हानात्मक बनल्याचे चित्र आहे. घटक पक्षांच्या नेत्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीतील खास पथक मावळात आल्याने महायुतीत संशयाचे धुके निर्माण झाले. दुसरीकडे, महाविकास आघाडीला सहानुभूती असल्याचे काही ठिकाणी जाणवते, परंतु नेते-कार्यकर्ते आघाडी म्हणून लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे, तसेच सहानुभूतीचा फायदा घेण्यात कमी पडल्याचे निरीक्षण आहे.

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शहरी, निमशहरी, ग्रामीण भाग येतो. पहिल्यांदाच शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ नसून उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ आहे. दोन्ही उमेदवार पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक आहेत. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीमधील घटक पक्षांचे आमदार आहेत. पिंपरी-चिंचवड, पनवेल या महापालिकांसह लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर भाजपची सत्ता होती, तर वडगाव, देहूगावमधील नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता राहिली. कागदावर महायुतीची ताकद असल्याने सुरुवातीला महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी निवडणूक सोपी दिसत होती. परंतु, महायुतीसोबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंगत आली. वाघेरेंनी पिंपरी-चिंचवड, मावळमध्ये नात्यागोत्यांचा आधार, जुन्या पक्षातील सहकाऱ्यांची मदत घेत प्रचार सुरू केला.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

हेही वाचा: रायबरेलीतूनही लढणे ही वायनाडची फसवणूक; डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर टीका

विरोधी उमेदवार कोण आहे, हे माहिती नसल्याचे विधान केल्याने राजकारण होण्याची चिन्हे दिसताच बारणेंनी सारवासारव केली. पण, बारणे यांना अहंकार निर्माण झाल्याचा पलटवार वाघेरे यांनी केला. त्यानंतर बारणे यांनी वैयक्तिक बोलणे टाळून समोरच्या उमेदवाराने विकासकामांवर बोलावे, तसेच विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याचे सांगण्यावर भर दिला. वाघेरे यांचे आव्हान दिसू लागल्याने मतविभागणीसाठी त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्याची खेळी महायुतीने खेळली. त्यातील संजय वाघेरे यांचा अर्ज बाद झाला, तर संजोग पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, पण काहीही न बोलता निघून गेले. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली.

पवारांच्या ‘राष्ट्रवादी’तील पदाधिकाऱ्यांशी वाघेरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने अनेक कार्यकर्ते त्यांचा प्रचार करताना दिसतात. भाजपचेही काही पदाधिकारी मनापासून काम करत नसल्याचे सांगितले जाते. परिणामी, महायुतीमधील पदाधिकाऱ्यांच्या कामावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी दिल्लीतील सहा जणांचे पथक मावळात दाखल झाले. या पथकामुळे महायुतीत संशयाचे धुके निर्माण झाले असून, अस्वस्थता असल्याचे दिसते. वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे यांनी बारणे यांच्यावर हल्ला करण्याचे टाळले. त्या तुलनेत आमदार रोहित पवार यांनी बारणे यांच्यावर हल्ला करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुत्र पार्थचा पराभव पचविला असेल, पण मी भावाच्या पराभवाचा बदला घेणार असल्याचे सांगून उपरोधिक टोला लगावला.

हेही वाचा: १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र दावेदारी करूनही मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला आणि बारणे यांनाच उमेदवारी मिळाली. पण, नाराजी लवकर दूर झाली नाही. परिणामी, महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी महिनाभराने प्रचारात सक्रिय झाले. पनवेल, चिंचवड या शहरी भागातील लोक भाजप पर्यायाने महायुती सोबत असल्याचे दिसतात. खासदारांचा अधिक संबंध येत नाही, त्यामुळे आमदार सांगतील त्यानुसार आम्ही मतदान करू, असे पनवेल, उरणमधील लोकांकडून सांगितले जाते. पनवलेमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, उरणमध्ये महेश बालदी आणि कर्जतमध्ये महेंद्र थोरवे हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय दिसतात. तर, उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्यावर वाघेरे यांची भिस्त असून पनवेल, कर्जतमध्ये मोठा चेहरा ठाकरे गटाकडे दिसत नाही. घाटाखालील या भागात बारणे यांची प्रचारात आघाडी दिसून येते. तर, घाटावरील पिंपरी, चिंचवड, मावळमध्ये दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तिन्ही मतदारसंघात दोघांचेही नातेवाईक आहेत. घाटापेक्षा घाटावरील या तीन विधानसभा मतदारसंघात दीड लाख मतदार जास्त आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारावर भर दिला.

हेही वाचा: अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

अखेरच्या टप्प्यात प्रचारात रंगत

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीचे राज्यस्तरीय नेते प्रचारासाठी आले नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान पार पडल्यानंतर मावळातील प्रचारात रंगत येईल. नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होईल, असे दिसते.

Story img Loader