पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. हा वाद आता भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला आहे. स्वपक्षातील आव्हान आणि महायुतीतील घटक पक्षाकडून घेरलेल्या शेळके यांनी भाजप तालुका आणि प्रदेश कार्यकारिणी यांच्यात समन्वय होत नाही, तोपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करू नका, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर तरी हा वाद मिटणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मावळ मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१९ मध्ये उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणूक लढले आणि मोठ्या फरकाने ते जिंकले. तेव्हापासून आमदार शेळके आणि भाजपमध्ये मतभेद आहेत. तीन वर्षे एका व्यासपीठावर एकत्र येणेही टाळत होते. राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीसोबत आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकत्र आले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीसाठी मावळ भाजपने आमदार शेळके यांना कडाडून विरोध सुरू केला. आमदारांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला, गळचेपी केल्याचा आरोप करत शेळके यांचे काम करणार नसल्याचा ठरावच भाजपने यापूर्वीच मंजूर केला आहे. मागील अनेक वर्षांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात लढत होत होती. आता महायुतीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आला आहे. ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’ असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच मित्रपक्ष भाजपसह स्वपक्षातून आव्हान निर्माण झाले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशाेधन परिषदेचे उपाध्यक्षपद नाकारले आहे. ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. भाजपमधील नाराज पदाधिका-यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. तळेगाव दाभाडे येथील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील भेगडे मंडळीचा कौटुंबिक संवाद आणि स्नेह मेळावा नुकताच पार पडला. बापूसाहेब भेगडे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Shrigonda Assembly Constituency suvarna pachpute
भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”
police cbi is ani
IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल
uddhav Thackeray and congress
स्वबळ न तपासताच ठाकरे गटाचा ‘त्या’ बारा जागांवरील आग्रहाने पेच
boyfriend died by heart attack
“तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून प्रियकराचा ओढवला मृत्यू!
Vijay Shivtare Told The Reason About Sunetra Pawar Defeat in Loksabha Election
Vijay Shivtare : बारामतीत सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक का हरल्या? चार महिन्यांनी विजय शिवतारेंनी नेमकं काय सांगितलं?
Atul Parchure Death news in marathi
Atul Parchure Death : अभिनेते अतुल परचुरेंचं निधन, पु.लंची शाबासकी मिळवणारा हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड

हेही वाचा : स्वबळ न तपासताच ठाकरे गटाचा ‘त्या’ बारा जागांवरील आग्रहाने पेच

आमदार सुनील शेळके म्हणाले, की भाजपमधील पदाधिकारी हे कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. जाणीवपूर्वक महायुतीत तेढ निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत. भाजपमधील नेत्यांनी त्यांचा पक्ष एक संघ कसा ठेवता येईल हे पाहावे. आमच्याकडे येऊन लुडबूड करायची आणि भांडण लावायचे हे उपद्व्याप करू नयेत. शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करण्याचे नियोजन सुरू आहे. यामागे काही भाजपचे नेते आहेत. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना सांगितले आहे. मावळ भाजप आणि प्रदेश कार्यकारिणी यांच्यात समन्वय होत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर दोनच दिवसांत हकालपट्टी; कोण आहे श्रीकांत पांगारकर?

बाळा भेगडे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

माजी आमदार बाळा भेगडे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पक्षाच्या भूमिकेनुसार काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. मावळात भाजपची ताकद आहे. पक्ष आणि राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी शक्य ते केले जाईल. जागा वाटपानंतर चित्र स्पष्ट होईल. मावळच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मावळच्या जागेबाबत आशावादी असल्याचे भेगडे यांनी सांगितले.