२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यांनी ‘इंडिया’ नावाने आघाडी केली असून यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी यांसारखे प्रमुख पक्ष सहभागी आहेत. या आघाडीत जास्तीत जास्त समविचारी पक्षांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टी अर्थात बसपा या पक्षाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचे भष्य केले आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यानंतर आता मायावती भविष्यात कोणता मार्ग निवडणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

मायावती यांनी भूमिका स्पष्ट करावी- शरद पवार

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विरोधकांची मुंबईत तिसरी बैठक होत आहे. या बैठकीआधी शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत मायावतींचा विरोधकांच्या आघाडीत समावेश होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिले. “मायावती यांची भाजपासोबत चर्चा सुरू असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यांनी अगोदर त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी. एकदा का त्यांची भूमिका स्पष्ट झाली की, मग आम्हाला त्यांच्याशी चर्चा करता येईल”, असे शरद पवार म्हणाले.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”

२०२४ सालच्या निवडणुकीत एकला चलो रे

शरद पवार यांच्या या विधानावर बसपा पक्षाच्या आगामी वाटचालीवर वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. असे असले तरी बसपा या पक्षाने मात्र सध्यातरी आम्ही कोणाशीही युती करणार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर मायावती यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) अनेक ट्विट्स करत आपली भूमिका स्पष्ट केली. आमचा पक्ष कोणाशीही युती करणार नाही. २०२४ सालची निवडणूक आम्ही एकट्यानेच लढवणार आहोत, असे मायावती म्हणाल्या. “इंडिया आणि एनडीए या दोन्ही आघाड्यांत गरीब जनतेच्या विरोधात, सांप्रदायिक, श्रीमंतांची भलामण करणारे, जातीवादी विचारधारा असणारेच पक्ष आहेत. याच कारणामुळे त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये”, असे मायावती म्हणाल्या.

“२००७ सालाप्रमाणेच निवडणूक लढवणार”

“२००७ सालाप्रमाणेच आम्ही लोकसभा तसेच चार राज्यांतील विधानसभा निवडणूक कोणाशीही युती न करताच लढवणार आहोत. या निवडणुकांत बंधुत्वाच्या मुद्द्यावरून देशभरातील लोकांना आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत”, असेही मायावती यांनी सांगितले. २००७ साली मायावती यांच्या बहुजन समाज पार्टी या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर मात्र हा पक्ष समाधानकारक कामगिरी करू शकलेला नाही.

बसपा पक्ष निवडणुकीनंतर सत्तेत सामील होणार?

दरम्यान, गेल्या महिन्यात मायावती यांची पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर जो पक्ष सत्तेत असेल त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली होती. सत्तेमध्ये समतोल असावा यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेणे गरजेचे आहे, असे तेव्हा मायावती म्हणाल्या होत्या. त्यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचाही समाचार घेतला. “विरोधकांशी हातमिळवणी केल्यास आम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगितले जाते. भाजपाला पाठिंबा दिल्यास आम्ही भाजपाचे समर्थक आहोत, असे सांगण्यात येते; हे फारच चुकीचे आहे. द्राक्षे मिळाली तर ठीक, अन्यथा ती आंबट आहेत, अशी सध्या परिस्थिती आहे”, असा टोमणाही मायावती यांनी लगावला.