महेश सरलष्कर

बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी, २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाशी युती करण्याची वा आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता फेटाळली आहे. लखनौमध्ये बुधवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत मायावतींनी केलेल्या ‘एकला चलो’च्या घोषणेला प्रामुख्याने काँग्रेस कसा प्रतिसाद देईल, त्यावर लोकसभाच नव्हे, उत्तरेतील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणेही अवलंबून असतील.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Pankaja Munde And Devedra Fadnavis Meeting At Mumbai.
Devendra Fadnavis : मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी; देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन, “खास…”
What Ashok Chavan Said About Congress?
Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…

मायावतींनी हळुहळू पक्षाची धुरा राष्ट्रीय समन्वयक व भाचा आकाश आनंद यांच्याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लखनौमधील बैठकीमध्ये आनंद यांची उपस्थिती लक्षवेधी होती. आनंद हेच आपले उत्तराधिकारी असून त्यांची लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भूमिका महत्त्वाची असेल, असे मायावतींनी बैठकीत स्पष्ट केले. आनंद यांनी राजस्थानमध्ये विधानसभेचा प्रचार सुरू केला असून तिथे ते जाहीरसभा घेत आहेत. ‘बसप’मध्ये नेतृत्व बदलाचे संकेत देत मायावतींनी पक्षाचा मूळ आधार असलेल्या दलित समाजाला; प्रामुख्याने जाटव मतदारांची पुन्हा एकजूट करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा… झारखंडमध्ये अर्थमंत्र्यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी, काँग्रेसची मोदी सरकारवर टीका!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या फेरबांधणीतून मायावतींनी भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही अप्रत्यक्ष आवाहन केल्याचे मानले जात आहे. २०२२ च्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत मायावतींनी निष्क्रिय राहून भाजपची अप्रत्यक्ष मदत केली होती. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मायावतींचे कौतुक केले होते. त्यामुळे ‘बसप’चा प्रमुख आधार असलेला जाटव मतदार भाजपकडे वळला होता. २००७ मध्ये ‘बसप’चा ३० टक्के मतांचा वाटा २०२२ मध्ये १२ टक्क्यांपर्यंत खाली आला. या घसरत असलेल्या ‘बसप’च्या मतांचा टक्का २०२२ मध्ये भाजपसाठी लाभदायी ठरला होता. हीच परिस्थिती २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कायम राहिली तर, भाजपला पुन्हा लाभ मिळवता येईल.

हेही वाचा… ‘भारताचे अंतराळ संशोधन कार्य १९६२ सुरू झाले’, भाजपाकडून चांद्रयान-३ चे श्रेय लाटण्यावर काँग्रेसची टीका

पण, उत्तर प्रदेशमधील पक्षाची कमकुवत स्थिती पाहून काँग्रेसने मायावतींसमोर हात पुढे केला तर, लोकसभा तसेच, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘बसप’शी छुप्या युतीचा फायदा मिळवता येऊ शकेल. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने बृजलाल खाबरी यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून उच्चवर्णीय भूमिहार अजय राय यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. ‘बसप’तून आलेल्या खाबरींना बाजूला करून काँग्रेसने मायावतींशी जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. विरोधकांच्या महाआघाडीमध्ये जागावाटपावर अजून चर्चा झालेली नसली तरी, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये मायावतींनी सक्रिय होण्याचा संदेश जाटव मतदारांपर्यंत पोहोचवला तर, ते भाजपऐवजी पुन्हा ‘बसप’कडे वळू शकतील. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील १९ टक्क्यांचा ‘बसप’च्या मतांचा वाटा २०१४ मध्येही कायम राहू शकेल.

हेही वाचा… भाजपाला शह देण्यासाठी ममता बॅनर्जींची ‘माँ, माटी’ रणनीती; लवकरच ‘पश्चिम बंगाल दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव!

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेसला मायवतींची मदत अपेक्षित असेल तर, पुढील तीन-चार महिन्यांमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये काँग्रेसने ‘बसप’ला मदत करण्याची अपेक्षा मायावतीही बाळगू शकतात. या तीनही राज्यांमध्ये ‘बसप’कडून उमेदवार उभे जाणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये ‘बसप’ने ९ उमेदवारांची घोषणाही केलेली आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसची मदार ओबीसी तसेच, दलित मतांवर असेल. विरोधकांच्या ‘इंडिया’मध्ये ‘बसप’ला सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता कमी असून मायावतींनाही राजकीयदृष्ट्या हे पाऊल परवडणारे नाही. त्यामुळे मायावतींनी भाजप व भाजपेतर आघाड्यांपासून दूर राहण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे विद्यमान पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुढाकार घेऊन मायावतींशी संवाद साधल्यास विधानसभा निवडणुकांमध्येही ‘बसप’चा छुप्या युतीचा काँग्रेसला लाभ मिळू शकेल.

Story img Loader