दिल्ली महापालिकेतील (एमसीडी) २५० वॉर्डांचे सदस्य निवडण्यासाठी आज (४ डिसेंबर) मतदान सुरू आहे. यादरम्यान मतदान यादीत अनेक नावे न आढळल्याने आम आदमी पार्टीने हे षडयंत्र म्हटल्याचा आरोप केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले की, अनेक नावे मतदान यादीत नाहीत. मतदान केंद्राबाहेर लोकांनी मतदान यादीत नाव नसल्याची तक्रार केली आहे. मतदान यादीत नाव नसल्याने लोक नाराज आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली महापालिका निवडणुकीत १.४५ कोटी मतदार मतदान करत आहेत. महापालिकेच्या २५० जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी एकूण १ हजार ३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीकवासीयांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना शहराला एक स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे आवाहन केले.

पत्रकापरिषदेत सिसोदिया म्हणाले की, मी लोकांना आवाहन करतो की दिल्लीच्या विकासासाठी त्यांनी बुद्धिमानी सरकारची निवड करावी. मी सर्व दिल्लीवासीयांना आवाहन करतो की, मतदान करताना त्यांनी हे लक्षात ठेवावं की एमसीडीची मुख्य जबाबदारी दिल्लीला स्वच्छ करणे, स्वच्छतेचे मुद्दे, भूमाफिया, भ्रष्टाचार, वाहनतळांवरील घाणीचे साम्राज्य, मोकाट जनावरे यावर काम करणे आणि रुग्णालये बनवणे आहे.