दिल्ली महापालिकेच्या निवडणुका ( एमसीडी ) काही दिवसांपूर्वी पार पडल्या आहेत. २५० जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ( आप ) भाजपाची १५ वर्षाची सत्ता उलथावून टाकली होती. एमसीडी निवडणुकीत ‘आप’ला १३४ जागा मिळत दणदणीत विजय झाला होता. तर, भाजपा १०४, काँग्रेस ९ आणि अन्य ३ असे उमेदवार निवडून आले आहेत.

दिल्ली विधानसभेनंतर आता पालिकेवर ‘आप’ची सत्ता आली आहे. मात्र, ‘आप’च्या विजयाने केंद्रातील सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला होता. कारण, या निवडणुकीसाठी भाजपाकडून ७ मुख्यमंत्री, १७ केंद्रीय मंत्री, १०० च्यावर खासदार प्रचारासाठी उतरवण्यात आले होते. तरीही, भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

22 girls in government hostel poisoned in Nandurbar
नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वसतिगृहातील २२ मुलींना विषबाधा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
Loksatta sanvidhanbhan Historical background of Jammu and Kashmir
संविधानभान: जम्मूकाश्मीरची ऐतिहासिक पार्श्वभूमी
Hemophilia Patient Treatment Maharashtra,
देशभरातून हिमोफिलिया रुग्णांची उपचारासाठी महाराष्ट्रात धाव! हिमोफिलिया रुग्णांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालय आधारवड
Migratory birds started arriving in Gondia district due to increasing cold in European countries
नवेगावबांध जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार,पक्षी प्रेमींना पर्वणी

हेही वाचा : “मोदी सरकारकडून राज्याच्या कारभारात हस्तक्षेप”; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सरकारला चार वर्ष झाली, मात्र…”

यानंतर आता ‘आप’ने आपला मोर्चा उत्तरप्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे वळवला आहे. आगामी काळात होणाऱ्या नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांसाठी ‘आप’कडून लवकरच एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. त्यात दिल्ली पालिका निवडणुकीप्रमाणे आश्वासनं देण्यात येणार आहे. गाझियाबाद, मेरठ, लखनऊ, आग्रा येथे महापालिका निवडणुका पार पडणार आहे.

उत्तर प्रदेश ‘आप’चे प्रवक्ते वैभव माहेश्वरी यांनी सांगितलं की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष पार्किंग माफियांपासून सुटका, मोफत पिण्याचे पाणी, घरे, पाणी करातील कथित भ्रष्टाचार संपवण्याची आश्वासने आपल्या जाहीरनाम्यात देणार आहे. सफाई कामागारांना कायमस्वरूपी रोजगार आणि मोहल्ला दवाखाने सुरु करण्याचे आश्वासनही दिलं जाणार आहे. एमसीडी निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश आणि आसाममध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा जिंकल्या होत्या. लोकांचा आपवर विश्वास आहे,” असेही माहेश्वरी यांनी म्हटलं.

हेही वाचा : भाजप सरकारच्या काळात एकाच राज्यपालांची उचलबांगडी

उत्तर प्रदेश ‘आप’च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक समितीचे अध्यक्ष सभाजीत सिंह यांनी सांगितलं, “आप संपूर्णपणे स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढणार आहे. उमेदवरांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यांची तपासणी केली जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर पक्षाकडून उमेदवारांची घोषणा केली जाईल.”

Story img Loader