ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपाने त्रिपुरामध्ये बाजी मारली आहे. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सोबत घेत भाजपा सत्तेत सहभागी होण्याच्या प्रयत्नात आहे. तर नागालँडमध्येही भाजपा त्यांचा सहयोगी पक्ष एनडीपीपीसह सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान या तिन्ही राज्यांमध्ये वरवर पाहता भाजपाने चांगली कामगिरी केल्याचे दिसत असले तरी त्रिपुरासारख्या राज्यात भाजपाचा जनाधार घटला आहे. तसेच बऱ्याच जागांवर भाजपा उमेदवाराचा विजय एक हजार मतांच्या फरकाने झाला आहे.

हेही वाचा >> पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठा झटका, पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; ममता बॅनर्जींची चिंता वाढली!

anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
The ploy of power by creating conflicts between castes Prime Minister Narendra Modi accuses Congress Print politics news
जातीजातीत भांडणे लावून सत्तेचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

त्रिपुरा राज्यातील निवडणुकीचे विश्लेषण

त्रिपुरामधील जुबराजनगर विधानसभा मतदारसंघात सीपीआयचे (एम) उमेदवार शैलेंद्र चंद्रा नाथ यांनी भाजपाच्या मलिना देबनाथ यांचा अवघ्या २९६ मतांच्या फरकाने पराभूत केले. त्रिपुरामध्ये या जागेवर सर्वांत कमी मतांच्या फरकांनी मिळालेला हा विजय आहे. ताकरजाला मतदारसंघात तिप्रा मोथा पक्षाचे उमेदवार बिश्वजित कालाई यांनी आयपीएफटीचे उमेदवार बिधान देबबर्मा यांना सर्वाधिक ३२४५५ मतांच्या फरकांनी पराभूत केले आहे.

हेही वाचा >> कसबा २८ वर्षांनंतर काँग्रेसच्या ताब्यात कसा गेला?

त्रिपुरामध्ये भाजपाचा जनाधार घटला

त्रिपुरामध्ये भाजपाची सत्ता आली असली तरी येथे भाजपाचा जनाधार घटला आहे. २०१८ च्या निवडणुकीत भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवला होता. तर या निवडणुकीत भाजपाला ३२ जागांवरच समाधान मानावे लागले. तसेच २०१८ साली भाजपाला एकूण ४३.५९ टक्के मते मिळाली होती. या वेळी मात्र मतांची टक्केवारी ३८.९७ पर्यंत घसरली आहे. २०१८ साली भाजपाचा विजयी उमेदवार आणि त्याच जागेवरील पराभूत उमेदवार यांच्यातील मतांमध्ये सरकारी फरक ४६०६ मतांंचा होता. तर हाच फरक २०२३ सालच्या निवडणुकीत ३४५८ पर्यंत घटला आहे. एकीकडे भाजपाचा जनाधार घटला असला तरी या निवडणुकीत भाजपाचे २१ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हाच आकडा २०१८ साली १६ वर होता.

हेही वाचा >> त्रिपुरामध्ये भापजपाकडून महिलेला मुख्यमंत्रीपद? माणिक साहांची केंद्रात वर्णी?

नागालँड निवडणुकीचे विश्लेषण

नागालँड विधानसभा निवडणुकीत वेस्टर्न अंगामी या मतदारसंघात एनडीपीपीच्या उमेदवाराचा सर्वांत कमी मतांच्या फरकाने विजय झाला. या ठिकाणी एनडीपीपीच्या सलहौतुओनुओ कुर्से यांनी अपक्ष उमेदवार केनेझाको नाख्रो यांना अवघ्या सात मतांच्या फरकांनी पराभूत केले. नागालँडमध्ये पहिल्यांदाच दोन महिलांचा विजय झालेला आहे. कुर्से त्यांपैकी एक आहेत. तर घासपानी-१ या मतदारसंघातून भाजपाचे एन जाकोब झिमोमी यांनी अपक्ष उमेदवार व्ही फुशिका ओमी यांचा सर्वाधिक २००९६ मतांच्या फरकाने पराभव केला. नागालँडमध्ये एकूण १९ जागांवर विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांमध्ये अवघ्या एक हजार मतांचा फरक आहे.

हेही वाचा >>मेघालय : भाजपाला सोबत घेत एनपीपीकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली, तृणमूलचाही बहुमत असल्याचा दावा; कोणाची सत्ता येणार?

मेघालय

त्रिपुरा, नागालँड या राज्यांच्या तुलनेत मेघालयमधील निवडणूक अटीतटीची ठरली. कारण येथील १५ जागांवर विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये १००० पेक्षा कमी मतांचे अंतर आहे. येथे राजबाला मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे मिझानुर रहमान काझी यांनी एनपीपीचे मोहम्मद अब्दुस सालेह यांचा अवघ्या दहा मतांच्या फरकांनी पराभव केला. तर मावलाई येथे सर्वाधिक म्हणजेच १५६४८ मतांच्या फरकाने व्हॉईस ऑफ द पीपल्स पार्टीचे ब्राईटस्टारवेल मारबानीयांग यांनी एनपीपीचे उमेदवार तेईबोरलँग पाथव यांचा पराभव केला.