शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी राज्यात काही अपवाद वगळता काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडली नव्हती. पण लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. पक्षातील आणखी काही नेतेही काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना तर अजित पवार यांच्या बंडातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. या तुलनेत राज्य काँग्रेसमध्ये गेल्या पाच वर्षात मोठी फूट पडलेली नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. अमरिश पटेल, चंद्रकांत रघुवंशी आदी नेते पक्ष सोडून गेले. पण शिवसेना वा राष्ट्रवादीप्रमाणे राज्य काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडलेली नाही.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही

हेही वाचा : नवी मुंबईतील दि.बा. पाटील नामांतराचा प्रश्न अधांतरीच, स्थानिकांमध्ये चलबिचल वाढली

पक्ष सोडणार म्हणून अनेक नेत्यांची नावे समोर आली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत नेहमीच संशय व्यक्त करण्यात आला. अर्थात, प्रत्येक वेळी अशोक चव्हाण यांनी पक्षांतराचा इन्कार केला व अफवा असल्याचा दावा केला होता. एकनाथ शिंदे सरकारवरील बहुमत सिद्ध करण्याच्या मतदानाच्या वेळी अशोक चव्हाण व त्यांचे सहा-सात समर्थक आमदार उपस्थित नसल्याने संभ्रम वाढला होता. अमित देशमुख यांच्याबाबतही अशाच वावड्या उठल्या होत्या. पण पक्षात मोठी फूट पडली नव्हती.

हेही वाचा : महोत्सवातून भाजपची युवा मतदारांना साद

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत येणार असे चित्र निर्माण झाले. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) याबरोबर काँग्रेस नेत्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. राजकीय भवितव्याची काळजी असलेल्या काही नेत्यांना भाजपचे आकर्षण वाटू लागले आहे. काँग्रेसमधील काही नेते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छूक असल्याचे विधान मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.

हेही वाचा : एकीकडे राम मंदिर सोहळ्याची चर्चा, दुसरीकडे काँग्रेसची यात्रा अन् जेडीयूची खास रणनीती; बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग!

मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची संधी नसल्याने त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचा मार्ग पत्करला. त्यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा अथवा राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील काही नेते कुंपणावर आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकतर्फी यश मिळाल्यास राज्य काँग्रेसमधील काही बडे नेतेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जाते.

Story img Loader