सुहास सरदेशमुख

मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या मुद्यावरून राज ठाकरेंना विरोध करण्याऐवजी ‘इफ्तार पार्टी’ करू असे निमंत्रण देणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे त्यांचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासह औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाले. भगवा फेटा घालून त्यांनी केलेली ही कृती हिंदुत्ववाद्यांची कळ काढणारी होती. पण आता मात्र त्यांनी औरंगजेब आणि मोगलांशी आमचा काय संबंध असा सवाल करत घूमजाव केले आहे. औरंगजेब हा एमआयएम पक्षाचा कधीच ‘आदर्श’ नव्हता. गेल्या ४०० वर्षातील चुकांचे खापर आताच्या मुस्लिम समाजावर का फोडता? असा सवाल करत तसे करणे चुकीचे आहे, अशी भूमिका ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये इम्तियाज जलील यांनी मांडली. त्याचबरोबर आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वादाचा मुद्दा चालणार नाही, कारभारावरून मतदान होईल, असे भाकितही जलील यांनी वर्तवले.

Mallikarjun Kharge against voting machines demanded a protest print politics news
खरेग यांच्याकडून मतपत्रिकेचा आग्रह; देशव्यापी मोहीम राबविण्याचे पक्षाकडून संकेत
Mumbai Municipal Corporation refutes allegations regarding EVMs of MNS candidate in Dahisar print politics news
‘ईव्हीएम’संदर्भातील आरोपांचे महापालिकेकडून खंडन; दहिसरमधील मनसे उमेदवाराच्या आरोपांत…
Narasaiah Adam retires from politics Decision taken after heavy defeat in Solapur print politics news
नरसय्या आडम राजकारणातून निवृत्त; सोलापुरातील दारुण पराभवानंतर निर्णय
Shiv Sena Thackeray candidates defeated on ten seats in Thane district thane news
ठाणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचा धुव्वा; लढविलेल्या दहा जागांवरील उमेदवार पराभूत
Shiv Sena campaign for the Chief Minister post Mumbai news print politics news
एक‘नाथ’ है तो ‘सेफ है ….’ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे अभियान
The High Court on Tuesday dismissed the petition challenging the MP of Sanjay Dina Patil print politics news
संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित
MVA protest against voting machines Sharad Pawar Uddhav Thackeray hold separate meetings Mumbai news print politics news
मतदान यंत्रांविरोधात ‘मविआ’चे आंदोलनास्त्र; शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या स्वतंत्र बैठका
Waiting for the joint meeting of the Mahayuti No decision yet on the talks in Delhi Print politics news
महायुतीच्या संयुक्त बैठकीची प्रतीक्षा; दिल्लीतील चर्चेबाबत अद्याप निर्णय नाही

कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर एमआयएमकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मग औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होण्याचा अर्थ काय?

औरंगजेबाच्या कबरीवर आम्ही जाणीवपूर्वक गेलो नव्हतो. पानचक्की आणि खुलताबाद येथे अकबरुद्दीन ओवेसी यांचा दौरा ठरला होता. जरजरी बक्ष तसेच अन्यही कबरीवर आम्ही ‘दुआ’ मागितली. मुस्लिम समाजात कबरीतील प्रत्येकासाठी दुआ मागण्याची पद्धतच आहे. त्यातच औरंगजेबाच्या कबरीवर गेलो होतो. पण आम्ही गेलो म्हणून गदारोळ केला जातो. याच कबरीवर शेतकरी नेते राकेश टिकैतही जाऊन आले होते. पण एमआयएमला राष्ट्रद्रोही ठरविण्यासाठी त्याचा बभ्रा करण्यात आला.

म्हणजे औरंगजेब एमआयएमचा आदर्श आहे की नाही?

आमचा औरंगजेबाशी संबंध नाही. कोणत्याही मोगलाशी संबंध जोडून आम्ही राजकारण करू इच्छित नाही. त्यामुळे ४०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा संबंध जोडून आजच्या मुस्लिमांना त्रास कशासाठी द्यायचा? पूर्वीही आम्हाला रझाकाराची औलाद अशी शेलकी विशेषणे लावली जात. १७ सप्टेंबरच्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमासही उपस्थित राहत नसल्यावरुन टीका केली जायची. पण हा समज चुकीचा होता. या कार्यक्रमास आम्ही उपस्थिती लावली. पण त्यामुळे दरवेळी आम्हाला राष्ट्रप्रेम सिद्ध करायला लावणारी ही प्रक्रिया चुकीची आहे. खरे आमचा संबंध मौलाना आझादांसारख्या नेत्यांशी का लावला जात नाही. पण चांगल्या प्रतिमांच्या नेत्यांशी कधी संबंध न जोडणे हा देखील बदनामी करण्याचाच एक भाग आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे कर्णधार अजित पवार, पण भाजपकडून कोण?

भोंगे हटविण्याच्या मुद्यानंतर मुस्लिम समाजातील भावना काय होत्या आणि त्याचा महापालिका निवडणुकीत किती परिणाम होईल?

राज ठाकरे यांनी उचलून धरलेला भोंगे हटविण्याचा मुद्दा १५ वर्षांपूर्वी औरंगाबादसारख्या शहरात काडी टाकण्यास पुरेसा ठरला असता. पण आता परिस्थिती बदलेली आहे. भोंगे प्रकरणावर बोलण्यासाठी राज ठाकरे औरंगाबादला येणार होते. तेव्हा त्यांना आम्ही शहरात या आपण रमझाननिमित्त इफ्तार पार्टी करू असे निमंत्रण दिले. समजा तेव्हा म्हणजे राज ठाकरे येण्यापूर्वी येथे येऊन दाखवा असे आव्हान देत आम्ही रस्त्यावर उतरलो असतो तर कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असती. पण आम्ही असे होऊ दिले नाही. आजही अनेक जण त्यासाठी धन्यवाद देत आहेत. अशा प्रकरणाचा महापालिकेच्या निवडणुकीवरही परिणाम होणार नाही. कारण आता प्रचाराच्या शेवटच्या काळातही हिंदू- मुस्लिम असा टोकदार प्रचार कामी येणार नाही. करण आता शहर बदलू लागले आहे.

मग कोणते मुद्दे महापालिका निवडणुकीत असतील?

खरे तर पूर्वीच पाणी, रस्ते, आरोग्य सेवा यावर मतदान झाले असते तर अशी बकाल अवस्था औरंगाबादची झालीच नसती. सत्तेत असताना काही न करणाऱ्या भाजपने पाण्यासाठी मोर्चा काढला. शिवसेनेतील आठ आणि भाजपमधील सहा-सात सतत निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी टक्केवारी घेऊन महापालिका चालवली. त्याचे परिणाम आता शहराला बसू लागले आहेत. त्यामुळे खरे तर हिंदुत्वासारख्या मुद्यांऐवजी वर्धापन दिनी होणाऱ्या सभेत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातून पळवून नेलेले क्रीडा विद्यापीठ, आयआयएम या संस्थासह शहराला कोणत्या महिन्यात पाणी मिळेल हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. पण तसे होणार नाही. औरंगाबादच्या बकालपणाला शिवसेना व भाजप ही ३० वर्षांपासून सत्तेत असणारी युतीच जबाबदार आहे. एमआयएमचे २६ नगरसेवक पूर्वी निवडून आले होते. त्यात नीट काम न करणाऱ्या पाच नगरसेवकांची एमआयएममधून हकालपट्टी केली. आता नव्याने १२६ पैकी ४० जागांवर एमआयएम विजयी होईल.