छत्रपती संभाजीनगर : महायुतीमधील नेते रावसाहेब दानवे आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला जाऊ लागला आहे. ‘सिल्लोड मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानचा भाग वाटावा या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या विरोधात गुरुवारी सिल्लोडमध्ये पालकमंत्री सत्तार यांच्या समर्थकांनी मोर्चा काढला आणि सिल्लोडमधील दुकानेही बंद ठेवली. काही दिवसापूर्वी दानवे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या विरोधात रास्तारोको आंदोलन केले होते. त्यामुळे महायुतीमधील दोन नेत्यांमधील संघर्ष अधिक तीव्र होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>> बीडमध्ये भाजपसमोर आव्हान

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड मतदारसंघातून मदत झाली नसल्याचा आरोप करत सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली होती. स्वातंत्र्य सैनिकांच्या जमिनी हडप करण्यापासून ते अनेक प्रकरणातील बाबी आता चव्हाट्यावर आणू, असे रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यानंतर पालकमंत्री सत्तार आणि रावसाहेब दानवे यांचे विमानतळावरील छायाचित्र पुन्हा समाजमाध्यमांमध्ये आवर्जून देण्यात आले. मात्र, सोयगाव तालुक्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक अटक करायला लावल्याचा आरोप करत रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनात हजेरी लावली. त्यामुळे सत्तार विरुद्ध दानवे हा संघर्ष पुन्हा पेटल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> जलपूजनातून प्रचाराचा धडाका

गुरुवारी मंत्री सत्तार समर्थक कार्यकर्त्यांनी सिल्लोडमध्ये मोर्चा काढून रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड मतदारसंघास पाकिस्तान म्हटल्याने त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात भाषणेही करण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून दानवे यांना ७३ हजार २७८ मते पडली होती तर कॉग्रेसचे कल्याण काळे यांना एक लाख एक हजार ३७ मते मिळाली होती. या निवडणुकीपूर्वीही रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी अर्जून खोतकर यांच्या पाठिशी राहू, असे सत्तार यांनी जाहीर केले होते. पूर्वी माध्यमांमध्ये वक्तव्ये करणारे हे दाेन नेत्यांचे समर्थकही आता एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरत असल्याचे दिसून येत आहे.