पुणे : ‘लोकसभा निवडणुकीत महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीछेहाटीचा चिमटा सर्वसामान्य लोकांना बसला आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्यामुळे गडबड झाली, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान निश्चित वाढेल. हरियाणा विधानसभा निवडणुकीत हाच प्रकार झाला. मतांचा टक्का जेव्हा वाढतो, तेव्हा तो भाजपचा असतो,’ असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात स्पष्ट केले. ‘लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाली, असे माझे वैयक्तिक मत नाही. लोकसभेत महायुतीच्या १७ जागा निवडून आल्या. दहा जागा पाच ते २३ हजार मतांनी गेल्या. त्या आल्या असत्या, तर महायुतीच्या २७ जागा झाल्या असत्या. महाविकास आघाडीच्या जागा ३१ वरून २१ झाल्या असत्या. या १७ जागांवरील १३० विधानसभा मतदारसंघांत महायुती आघाडीवर आहे. त्यामुळे जागा मिळाल्या नाहीत, म्हणून पीछेहाट झाली, असे म्हणता येणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी हक्काच्या जागा आणि प्रयत्न करून निघणाऱ्या जागांवर लवकर उमेदवार देण्याचे भाजपचे मूळ नियोजन होते. त्यानुसार दोन महिने आधीच या जागा जाहीर होणार होत्या. मात्र, महायुतीमधील घटक पक्षाने चर्चेपूर्वी जागा जाहीर केल्या, तर विसंवाद वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या जागा जाहीर करण्यात आल्या नाहीत,’ असे पाटील यांनी सांगितले.
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
विधानसभा निवडणुकीसाठी हक्काच्या जागा आणि प्रयत्न करून निघणाऱ्या जागांवर लवकर उमेदवार देण्याचे भाजपचे मूळ नियोजन होते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-11-2024 at 08:31 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSचंद्रकांत पाटीलChandrakant Patilमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad event print politics news zws