मालेगाव : अमली पदार्थाचे उत्पादन आणि त्याची तस्करी करण्याच्या नाशिकमधील अत्यंत गंभीर प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी केलेला भांडाफोड ते पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटील या अमली पदार्थ तस्कराला मुंबई पोलिसांनी केलेली अटक, या सर्व घटनाक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

अमली पदार्थ तस्करीला जणू काही पालकमंत्री दादा भुसे यांचे अभय लाभल्याचा सूर आळवत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांकडून भुसे यांना थेट लक्ष्य केले जात आहे. हा हल्ला परतवून लावण्यासाठी शिंदे गट आणि खुद्द भुसे हे आक्रमक झाल्याचे दिसत असले तरी, भाजप आणि अजित पवार गट हे मित्रपक्ष त्यांच्या मदतीला आलेले दिसत नाही. विरोधकांकडून शिंदे गटाला येनकेन प्रकारे अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत असताना सत्तेत भागीदार असणाऱ्या उभय मित्रपक्षांनी बाळगलेले मौन चर्चेचा विषय झाले आहे.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”

हेही वाचा – मध्य प्रदेश निवडणूक : ज्योतिरादित्य सिंदिया यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी; ३४ मतदारसंघांत ‘राजकीय वजन’ सिद्ध करावे लागणार!

पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेणारा संशयित ललित पाटील २०२० पासून अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटकेत होता. नाशिकचा रहिवाशी असणारा ललित आजारपणाचे कारण देत तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. या रुग्णालयातूनच अमली पदार्थ तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पुणे पोलिसांकडून अटक होण्यापूर्वीच दोन ऑक्टोबरला ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. पाठोपाठ मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिकजवळील शिंदे गावातील अमली पदार्थ उत्पादित करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. याप्रकरणी ललित, त्याचा भाऊ भूषण आणि अन्य साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर फरार झालेल्या भूषणला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. मुख्य संशयित ललित यास दोन आठवड्यांनी पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले.

शिंदेसारख्या लहानशा गावात अत्यंत घातक अमली पदार्थ बनविण्याचे उद्योग बिनदिक्कतपणे सुरू होते. दुसरीकडे त्याचा मास्टरमाईंड ललित हा चक्क रुग्णालयातून अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली. या गंभीर प्रकरणाची इतके दिवस पोलिसांसह कुणालाच गंधवार्ता कशी लागू शकली नाही, असा प्रश्नही त्यामुळे उपस्थित होत आहे. तसेच अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटकेत असलेला ललित प्रदीर्घ काळ रुग्णालयात कसा राहू शकतो, हा कळीचा मुद्दाही ऐरणीवर आला. यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे सुरू केले. एवढेच नव्हे तर, ललित यास रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयीन प्रशासनावर दबाव आणला, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला.

अमली पदार्थ तस्करी प्रकरणाच्या निमित्ताने महायुती विशेषत: शिंदे गटाला घेरण्यासाठी ठाकरे गट जास्तीच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे. त्यातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचे पाळेमुळे खणून काढावेत तसेच पालकमंत्री भुसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी ठाकरे गटाने नाशिकमध्ये खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढण्यात आला.

शिवसेना अविभाजित होती, तेव्हा तस्कर ललितने शिवसेनेत प्रवेश केला होता. मातोश्रीवर झालेल्या तत्कालिन प्रवेश सोहळ्यास जिल्ह्यातील अन्य नेत्यांसमवेत भुसे हेही हजर होते. हा संदर्भ देत भुसे यांचा ललितशी संबंध जुळविण्याचे प्रयत्न विरोधकांनी चालविले आहेत. तर, ललितशी आपला काहीच संबंध नाही, त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी आपण कुणावरही दबाव आणला नाही, असा दावा करत याप्रकरणी कोणत्याही चौकशीस आपली तयारी असेल, किंबहुना नार्को चाचणी केली तरी चालेल,असे आव्हानच भुसे यांनी दिले.

हेही वाचा – दलित, मुस्लीम शिक्षक सेवकांचा पगार दुप्पट; जातनिहाय सर्व्हेच्या आकडेवारीनंतर बिहार सरकारचा मोठा निर्णय

अमली पदार्थ तस्करी प्रकरणाच्या निमित्ताने विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर पालकमंत्री भुसे यांच्या समर्थनासाठी शिंदे गटाने नाशिक, मालेगाव येथे निषेध नोंदवत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्रपक्ष असलेल्या भाजप, अजितदादा गटाने या प्रकरणात बघ्याची भूमिका घेतल्याचे जाणवत आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाकडे असलेले हे पालकमंत्री पद भाजपच्या गिरीश महाजन आणि दादा गटाच्या छगन भुजबळ या दोघांना हवे आहे. शिंदे गट मात्र हे पद सोडण्यास राजी नाही. ताज्या प्रकरणात विरोधकांनी लक्ष्य केलेल्या शिंदे गटाचा बचाव करण्यात म्हणूनच मित्रपक्षांनी कंजुषी दाखविली की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे.

खासदार राऊत यांनी मोर्चावेळी नाशिक शहरातील आमदारांवर हप्तेखोरीचे आरोप केले होते. तेव्हा त्यास प्रत्युत्तर देण्यात भाजपचे आमदार पुढे आले. राऊत यांनी केलेले आरोप पुराव्यासह सिद्ध करावेत, त्यासाठी खुल्या चौकशीस तयार आहोत, असे आव्हान शहरातील भाजप आमदारांनी दिले. अमली पदार्थ माफिया ललित यास अटक केल्याने ठाकरे गटाचा थयथयाट झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा हा अपवाद वगळता मित्रपक्ष पालकमंत्री भुसे यांच्याबाबत फारसे काही बोलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

Story img Loader