चंद्रशेखर बावनकुळे
बावनकुळे हे शेतकरी कुटुंबातील आहेत. १९७७ मध्ये ते कोराडी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. २००४ मध्ये त्यांनी प्रथमच कामठी मतदार संघातून विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडून आले. २०१४- २०१९ महाराष्ट्राचे उर्जा, नविन व नवीकरणीय, राज्य उत्पादन शुल्क मंत्री व नागपूर जिल्हा पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. जानेवारी २०२२ विधान परिषद सदस्य (नागपूर स्थानिक प्राधीकारी संस्था मधून निर्वाचीत)
१९९५ पासून नागपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते. १९९९- २००१ नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे महामंत्री, २००२ -२००४ संघटन प्रमुख भारतीय जनता पक्ष कामठी विधानसभा क्षेत्र, २०११ ते २०१४ जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी २०१४ – २०१७ प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी, २०२१ ते २०२२ प्रदेश महामंत्री महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी (महाराष्ट्रातील १६ लोकसभा क्षेत्र प्रवास कार्यक्रम प्रभारी) १२ ऑगस्ट २०२२ पासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. सामाजिक संघटनेत त्यांनी काम केले आहे.
आणखी वाचा-मंत्र्यांची ओळख : ॲड. माणिक शिंदे, संजय सावकारे, जयकुमार रावल, नरहरी झिरवळ
इंद्रनील नाईक ( राष्ट्रवादी)
पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे युवा आमदार इंद्रनील नाईक माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ते चिरंजीव आहेत. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे नातू असून ते पुसद विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यावेळी ते ९० हजारांच्या वर मताधिक्याने निवडून आले आहेत.
राज्याच्या स्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असताना नाईक कुटुंबीयांकडे कायम मंत्रिपद राहिले आहे. २०१४ नंतर तब्बल १० वर्षानंतर पुसदच्या नाईक कुटुंबीयास इंद्रनील नाईक यांच्या रूपाने प्रथमच मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. इंद्रनील नाईक हे २००४ पासून वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे सदस्य आहेत. बीएससी, एलएलबी असे त्यांचे शिक्षण झाले आहे.
आणखी वाचा-मंत्र्यांची ओळख : राधाकृष्ण विखे- पाटील, प्रकाश आबिटकर, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्ता भरणे
ॲड. आशिष जयस्वाल (शिवसेना)
रामटेक मतदारसंघातून ॲड.आशिष नंदकिशोर जयस्वाल विधानसभेवर १९९९, २००४ आणि २००९ अशा सलग तीन वेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला.मात्र, त्यांना २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष होते. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती असताना ही जागा भाजपकडे गेल्यावर जयस्वाल यांनी अपक्ष निवडणूक लढवली व विजयी झाले. शिवसेनेतील फुटीनंतर ते शिंदे गटात गेले. यावेळी त्यांना मंत्रिपद देण्यात आले नसले तरी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली. व ते पाचव्यांदा निवडून आले आहेत.