अँड. माणिक कोकाटे

वय – ६७

पक्ष- राष्ट्रवादी (अजित पवार)

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
Chandrasekhar Bawankule , Chandrasekhar Bawankule bjp state president,
प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे तूर्तास कायम? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत संघटनात्मक घडी राखण्याचे प्रयत्न
Loksatta chadani chowkatun Lok Sabha Speaker Om Birla Lok Sabha Constituency Mahadji Shinde Congress
चांदणी चौकातून: बिर्लांचा कोटासाठी ‘कोटा’

मतदारसंघ- सिन्नर

शिक्षण – विज्ञान व विधी शाखा पदवी

राजकीय वाटचाल – राजकीय पार्श्वभूमी नसणारे कोकाटे सततची पक्षांतरे आणि बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी पाचव्यांदा ते निवडून आले. एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, १९९९ मध्ये शिवसेना आमदार. २००५ मध्ये नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेनेतून बाहेर. २००९ मध्ये काँग्रेसचे आमदार. राणेंनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. २०१९ मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी आणि पराभूत. राष्ट्रवादी विभाजित झाल्यानंतर अजित पवार यांना साथ देत निवडणूक लढवून पुन्हा आमदार

यापूर्वी भूषवलेली मंत्रिपदे – नाहीत.

मंत्रिपद मिळण्याचे कारण – पहाटेच्या शपथविधीपासून अजित पवार यांना प्रत्येक बंडात साथ देण्याची फलश्रृती. ज्येष्ठता. मराठा समाजाचा आक्रमक चेहरा

संजय वामन सावकारे

वय- ५५

पक्ष -भाजप

मतदारसंघ- भुसावळ

शिक्षण- पदविका (मेकॅनिक)

राजकीय वाटचाल- २००४ मध्ये भुसावळचे तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय सहायक म्हणून राजकारणात सक्रिय. २००९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुसावळ मतदारसंघातून उमेदवारी करुन विजय. २०१४ मध्ये भाजप प्रवेश, २०१९ आणि २०२४ या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय.

यापूर्वी भूषविलेली मंत्रिपदे- २०१३ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात कृषी व सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री.

यावेळी मंत्रिपद मिळण्याचे कारण- अनुसूचित जातींसाठी राखीव मतदार संघातून सलग चौथ्यांदा विजयी. यापूर्वी मंत्रिपदाचा अनुभव.

आणखी वाचा-भाजपचे धक्कातंत्र : रवींद्र चव्हाण लवकरच प्रदेशाध्यक्षपदी?

जयकुमार जितेंद्रसिंग रावल

वय- ४८

पक्ष- भाजप

मतदारसंघ- शिंदखेडा

शिक्षण – व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए.)

राजकीय वाटचाल – धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून २००४ पासून आमदार. दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवकपदापासून राजकीय कारकिर्दीस सुरुवात. दोंडाईचातील रावल संस्थानात जन्मलेल्या रावल यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. जयकुमार यांचे आजोबा दादासाहेब रावल आणि काका बापूसाहेब रावल यांनी आमदारकी भूषवली आहे. जयकुमार यांच्या वडिलांनी राजकारणात भाग घेतला नाही. जयकुमार हे प्रथमपासून भाजपशी एकनिष्ठ.

यापूर्वी भूषविलेली मंत्रिपदे – २०१६ मध्ये राज्याचे रोहयो, पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचे मंत्री.

यावेळी मंत्रिपद मिळण्याचे कारण – उच्च शिक्षण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध.

नरहरी सिताराम झिरवळ

वय – ६५

पक्ष – राष्ट्रवादी (अजित पवार)

मतदारसंघ- दिंडोरी

शिक्षण – कला शाखा पदवीचे द्वितीय वर्ष

राजकीय वाटचाल – राजकीय पार्श्वभूमी नाही. शेतमजूर, कामगार, कनिष्ठ लिपिक, सरपंच. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि विधानसभेचे उपसभापती अशी आजवरची त्यांची वाटचाल. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात. नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अजित पवारांना साथ. दिंडोरी मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडून आले.

यापूर्वी भूषविलेली मंत्रिपदे- नाही.

मंत्रिपद मिळण्याचे कारण – आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून मंत्रिपदी वर्णी. राष्ट्रवादीचा (अजित पवार) आदिवासी चेहरा.

Story img Loader