गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणापासून थोड्याकाळासाठी दूर असलेले भाजपाचे स्टार प्रचारक मिथुन चक्रवर्ती पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले आहेत. १७ ऑक्टोबर रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी २० सदस्यांची एक कमेटी जाहीर केली होती. भाजपाच्या या कोअर कमेटीमध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – केरळमधील CPM नेत्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, सोने तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश पुन्हा चर्चेत!

मिथुन चक्रवर्ती यांनी काही दिवसांपूर्वीच टीएमसीचे ३८ आमदार संपर्कात असल्याचे विधान केले होते. हे सर्व आमदार भाजपात येणार असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, एकाही आमदाराला ते भाजपात आणू शकले नव्हते. टीएमसीकडून हा दावा फेटाळण्यात आला होता. मात्र, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या ग्रामंपचायत निवडणुकीसाठी पुन्हा भाजपाने मिथुन चक्रवर्ती यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, “मिथुन चक्रवर्ती या कोअर कमेटीत सहभागी झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला काहीही फायदा होणार नाही. भाजपामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावरून लक्ष घालवण्यासाठीच त्यांना पुढे करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना थोडाफार लोकांचा पाठिंबा दिसत होता. मात्र, आता तोसुद्धा मिळणार नाही”, अशी प्रतिक्रिया टीएमसीचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांनी दिली आहे.

हेही वाचा – महापालिका निवडणुकीत पराभवाच्या भीतीने पुण्यातील गावे वगळण्याचा भाजप-शिंदे गटाचा राजकीय घाट

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी राजकारणाची सुरूवात डावी विचारधारा असेलल्या पक्षातून केली होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकांमध्ये डाव्यांचा पराभव झाल्यानंतर ते टीएमसीकडून राज्यसभेवर निवडून गेले. मात्र, २०१६ मध्ये प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार त्यांचे टीएमसीच्या वरिष्ठ नेत्याबरोबर मदभेद होते. त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र, २०२१मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. चीट फंड घोटाळ्यात सीबीआयकडून चौकशी सुरू असल्यानेच त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. अशा चर्चाही त्यावेळी रंगू लागल्या होत्या. निवडणुकीदरम्यान, त्यांनी प्रचारही केला होता. मात्र, त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते.