लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणजे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्याचा परवाना मिळाला असे समजतात की काय हे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार. बरळणे हा तसा अशा नवशिक्यांचा छंद. म्हणून काय काहीही बरळायचे. घरातली देखणी मुलगी सरकारी बाबूंना, काळीसावळी व्यावसायिकाला आणि राहिलेला गाळ शेतकऱ्यांच्या पोराला, अशा रीतीने लग्नाची क्रमवारी ठरल्याने शेतकऱ्यांना घरात ‘हेंबड, हांबड’ मुले जन्म घेतात हे या भुयारांचे उद्गार. आपलाही जन्म शेतकऱ्यांच्या पोटी झालेला याचा जणू विसरच पडलेला दिसतो या आमदारांना. हे महायश अजितदादांच्या गोटात सध्या स्थिरावलेले. मागच्या पराभवापासून खुद्द दादाच जीभ चावून बोलत असताना यांची मात्र सैल सुटलेली दिसते. गेल्या वेळी यांनी सध्या आधुनिक धर्मकारणाचे उद्धारकर्ते झालेल्या अनिल बोेंडेंचा पराभव केला. नंतर बोंडेंची अचानक लॉटरी लागली व त्यांच्या भाषेला धरबंदच उरला नाही. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हे कधीकाळी शेतकरी नेता असलेले भुयार निघालेले दिसतात.
आपटीबार: राजकीय ऱ्हासाचा ‘भुयारी’ मार्ग
लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणजे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्याचा परवाना मिळाला असे समजतात की काय हे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-10-2024 at 04:03 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla devendra bhuyar controversial statement farmer son marriage and woman print politics news css