छत्रपती संभाजीनगर : वैजापूर मतदारसंघात आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांचा उद्धव ठाकरे गटातील प्रवेश अचानक थांबला. मात्र, या मतदारसंघात आर. एम. वाणी हयात असते तर त्यांनी शिवसेतून बाहेर पडणाऱ्या आमदारस उलटे टांगले असते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश बोरनारे यांचा समाचार घेतला. त्यावर बोरनारे यांनीही उमेदवारीसाठी ‘ मातोश्री’ मध्ये उमेदवारीसाठी ‘ व्यवहार ’ होतात असा आरोप केला. यामुळे आता वैजापूरचे राजकारण तापले आहे.

हेही वाचा >>> सोलापुरात भाजपविरोधात धर्मराज काडादींना उमेदवारी?

गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील वैजापूर आणि पैठण या दोन मतदारसंघात दोन प्रवेश सोहळे घडवून आणले. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी दोन सभा घेतल्या. शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे यांनी सभा घेत नवा राजकीय पट मांडणी सुरू केली आहे. वैजापूरमध्ये डॉ. दिनेश परदेशी शिवसेनेमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र, त्यांचा प्रवेश झाला नाही. भाजपतील वरिष्ठांनी त्यांनी पक्ष बदलू नये, यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. या अनुषंगाने डॉ. परदेशी यांच्या संपर्क केला असता ते म्हणाले, ‘ कोणाचा दबाव वगैरे काही याविषयावर आपण नक्की बोलू. मी संपर्क करेन’ असे म्हणत या विषयावर बोलणे टाळले. दरम्यान ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आमदार रमेश बोरनारे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दूरध्वनी करुन काही शिवसैनिकांनी अपशब्द वापऱ्याची ध्वनीफित समाजमाध्यमांमध्ये शुक्रवारी फिरविण्यात आली.

हेही वाचा >>> विधानसभेचे पूर्वरंग: विदर्भात सरस तो राज्यात सत्ताधारी

या अनुषंगाने बोलताना आमदार रमेश बोरनारे म्हणाले, ‘ मी गेली २० वर्षे शिवसेनेत आहे. आमच्यासारख्या अनेकांनी या संघटनेत काम केले. पूर्वी उमेदवारी देताना पैशांचे व्यवहार होऊ नयेत अशी भूमिका मांडली होती. ती उद्धव ठाकरे यांच्यासमोरही मांडली होती. पैसे घेऊन उमेदवारी देऊ नये असे मीच म्हणालो होतो. पण मी उमेदवारीसाठी पैसे दिले नव्हते. पण मतदारसंघात येऊन काहीबाही म्हणत असतील तर त्याचे उत्तर तर द्यावे लागेल. बाळासाहेब असते तर असे पैसे घेऊन उमेदवारी देणाऱ्यांचे काय केले असते, असे वक्तव्य आपण केल्याचे त्यांनी सांगितले. वैजापूर विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्षे आर. एम. वाणी यांचा प्रभाव होता. त्यांनीच प्रा. रमेश बोरनारे यांना उमेदवारी देण्यासाठी शिफारस केली होती. ते हयात असते तर या ‘ गद्दारां‘ चे त्यांनी काय केले असते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर वैजापूर विधानसभेतील राजकीय वातावरण तापले आहे.