गणेश यादव
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असा चुलते- पुतणे संघर्ष सुरु असताना आता पवार कुटुंबातील तिस-या पिढीतील रोहित आणि पार्थ पवार या दोन चुलत बंधूंमध्ये राजकीय संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. पार्थनंतर आता आमदार रोहित यांनीही पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घातले आहे. त्यामुळे दोन बंधूंच्या संघर्षाचा नवा अध्याय पिंपरी-चिंचवडकरांना पहायला मिळण्याची शक्यता आहे.

बारामती खालोखाल पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची दादागिरी चालते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ यांचेही शहरात लक्ष असते. परंतु, आता हा बालेकिल्ला पुन्हा एकदा शरद पवारांना काबीज करायचा आहे. त्यासाठी त्यांनी नातू आमदार रोहित पवारांकडे पिंपरी-चिंचवडची धुरा सोपविली. त्यामुळे भविष्यात शहराच्या राजकारणात काका अजित विरुद्ध पुतणे रोहित आणि रोहित विरुद्ध पार्थ पवार या बंधूमध्ये राजकीय संघर्ष पहायला मिळू शकतो.

pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Uday Samant on Vijay Wadettiwar
Uday Samant: “भाजपामध्ये येण्यासाठी तुम्ही फडणवीसांना…”, उदय सामंत यांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार, दिले होते राजकीय भूकंपाचे संकेत
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”
Sharad Pawar Thackeray group former corporators keen to return home Discussion with Deputy Chief Minister Ajit Pawar Pune news
पिंपरी : शरद पवार, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना स्वगृही परतण्याचे वेध; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा

हेही वाचा >>>कांद्याच्या दरावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

पार्थ यांनी थेट लोकसभेची निवडणूक लढवत राजकारणात उडी घेतली. तर, रोहित यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात केली. कर्जत-जामखेडमधून विधानसभेवर निवडून गेले. लोकसभेतील दारुण पराभवानंतर पार्थ यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली खरी पण, दरबारी राजकारण सुरु केले. थेटपणे जनतेत मिसळताना दिसले नाहीत. याउलट रोहित हे दूरुन शहराचे राजकारण पाहत होते. त्यांचा थेट संपर्क नव्हता. आता पक्षातील फुटीनंतर रोहित यांनी शहरात बारकाईने लक्ष घातले. शहराचा विकास शरद पवार यांच्यामुळेच झाला. अजित पवार यांच्याकडे शहराचे नेतृत्व शरद पवारांनीच दिले होते. अजित पवारांना शरद पवारांमुळेच शहरात ओळख मिळाल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

शहराच्या पहिल्याच दौ-यात रोहित यांनी आक्रमक भूमिका घेतली. अप्रत्यक्षपणे अजित पवारांना थारेवर धरले. तरुण तुषार कामठे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली. संघटना म्हणून मोठी ताकद लावली जाईल. शरद पवार यांच्या विचारांचे नगरसेवक निवडून आणले जातील. कोणाच्या सांगण्यावरुन नव्हे तर सर्वेक्षण करुन उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले. रोहित यांची भाषण शैली, लोकांमध्ये मिसळणे ही कार्यपद्धती युवांना भावताना दिसते. याउलट पार्थ दरबारी राजकारण करताना दिसतात. नियमितपणे शहराकडे न फिरकणे, जनतेत न मिसळणे, केवळ प्रशासकीय अधिका-यांना पार्थ भेटताना दिसले. लोकसभेला पाच लाख मते मिळूनही ते चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीपासून दूर राहिले. वडिलांचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी पार्थ तर आजोबांना पुन्हा शहरातील सत्ता मिळवून देण्यासाठी रोहित प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या दोन चुलत बंधूमधील संघर्ष पिंपरी-चिंचवडकरांना पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा >>>महिला आरक्षण विधेयकावरील मतदानाला सुनील तटकरेंची दांडी

शरद पवारांची ऑक्टोबरमध्ये जाहीर सभा

पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही लक्ष घातले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे हे शहरातील राजकारणावर लक्ष ठेवून असतात. पक्षाचे मोठे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयही सुरु केले आहे. शरद पवार यांची ऑक्टोबर अखेरीस शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader