राजेश्वर ठाकरे

जलभ : एकेकाळी नक्षलवादी कारवायांत सक्रिय असणाऱ्या आणि नंतर महात्मा गांधी यांच्या विचाराने भारावून हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करून राजकारणात आलेल्या आमदार सीताक्का या भारत जोडो यात्रेत शेगाव ते जलभ दरम्यान सहभागी झाल्या. भारत जोडो यंत्रेच्या माध्यमातून समाज परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

वारांगल मुलूगु ( तेलंगणा)येथील सीताक्का या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या १५ व्या वर्षी नक्षली कारवाईत सहभागी झाल्या. तब्बल १० ते १५ वर्षे या चळवळीत सक्रिय होत्या. त्यांचे पती आणि भाऊही त्यात सहभागी होते. यादरम्यान त्यांना मुलेही झाली. त्यांची जबाबदारी आणि योग्य शिक्षण आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी नक्षलवाद सोडून नियमित जीवन जगण्याचा निर्धार केला. त्यांनतर तेलगू देसम पक्षाकडून निवडणूक लढवली. पण तेथे फार काळ न रमता त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर वारांगल मुलूगु येथून निवडणूक लढवित विजयी झाल्या.

हेही वाचा: रायगडात नव्या राजकीय समीकरणांची नांदी

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत तेलंगाणा येथून सहभागी झाल्यात. त्यांच्यासोबत दररोज पदयात्रा करतात. राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या विद्या चव्हाण शनिवारी सकाळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. त्या काल राहुल गांधी यांच्या शेगाव येथील सभेला उपस्थित होत्या.

Story img Loader