सुजित तांबडे

पुणे : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारही न देताना तटस्थ राहिलेल्या मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दैनंदिन नियोजनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असल्याने यावेळची पुण्याची जागा ‘मनसे’ लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवार कोण, हे अद्याप जाहीर किंंवा सूचितही करण्यात आले नसले, तरी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी ‘भावी खासदार’ म्हणून शहरभर फलकबाजी करत उमेदवारी स्वयंंघोषित केल्याने पक्षात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Kalpana Soren electoral campaign
Kalpana Soren: झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा; महिलांसाठीच्या योजना गेमचेंजर ठरणार?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
Kiren Rijiju criticized pm modi said PM Modi targets Congress
मोदींनी संसदेला ओलीस ठेवले होते…काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने…
Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये

पुण्यात मनसेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारही न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे मनसेच्या पारंपरिक मतांचे विभाजन झाले होते. त्यापूर्वी मनसेने दोनवेळा उमेदवार उभे केले होते. २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत रणजित शिरोळे यांनी ७५ हजार ९३० मते घेत मनसेची गठ्ठा मते असल्याचे सिद्ध केले होते. नंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत माजी आमदार दीपक पायगुडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी ९३ हजार ५०२ मते मिळविली होती. शिरोळे आणि पायगुडे हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत मनसेने उमेदवारच न दिल्याने वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने मनसेने जोर धरला आहे.

हेही वाचा >>> राजस्थानात भाजप आणि काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरून चुरस वाढली

अमित ठाकरेंकडे जबाबदारी

मनसेने पुणे लोकसभा मतदार संघाकडे विशेष लक्ष दिले आहे. या मतदारसंघाची जबाबदारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने अमित ठाकरे यांनी आढावा बैठका, पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही पुण्यातील दौरे वाढले आहेत. त्यामुळे यावेळी पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही मनसेने मनावर घेतल्याचे दिसून येत आहे.

वसंत मोरेंची फलकबाजी

पुणे लोकसभा मतदार संघासाठी मनसेने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी शहरभर ‘भावी खासदार’ म्हणून फलकबाजी केली आहे. मात्र, मोरे यांचे शहर पदाधिकाऱ्यांशी असलेले संबंध पाहता मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ही बाब खटकली आहे. पक्षाच्या शिस्तीनुसार पक्षप्रमुखांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतरच फलकबाजी करायला हवी होती, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

 ‘मी इच्छुक…’

‘पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. माझ्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली असली, तरी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढविण्यासाठी मी तयार आहे. याबाबत पक्षप्रमुखांकडे इच्छा व्यक्त केली आहे’ असे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी सांंगितले.