PM Modi Cabinet 3.0 राष्ट्रपती भवनात रविवारी (९ जून) भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत, इतिहास रचला. त्यांच्यासह ७२ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळातही महिला शक्तीला स्थान देण्यात आले आहे. ७२ मंत्र्यांमध्ये ७ महिला मंत्र्यांचा समावेश आहे. निर्मला सीतारमण, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल आणि शोभा करंदलाजे यांसारख्या महिला मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे, तर नवीन महिला नेत्यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. सर्वांचे लक्ष आता सोमवारी (१० जून) संध्याकाळी होणाऱ्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले आहे. या मंत्रिमंडळात कोणत्या महिला मंत्र्यांचा समावेश आहे? यावर एक नजर टाकू या.

केंद्रात महिलांचे प्रतिनिधित्व

२०१४ आणि २०१९ च्या तुलनेत मोदी 3.0 मध्ये महिला मंत्र्यांची संख्या घटली आहे. २०१९ मध्ये भाजपाच्या निर्मला सीतारमण आणि स्मृती इराणी, शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांच्यासह सहा महिला मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. एका वर्षानंतर, बादल यांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या (आता रद्द केलेल्या) विरोधात मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळात झालेल्या मोठ्या फेरबदलानंतर, महिला प्रतिनिधित्व ११ वर पोहोचले. २०१४ मध्ये मोदी पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हा त्यांच्या सरकारमध्ये फक्त आठ महिला मंत्री होत्या. २००४ आणि २००९ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये १० महिला मंत्र्यांचा समावेश होता.

mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
Four candidates from Nashik absent from PM Narendra Modis meeting
मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
MVA Five Big Promises For Maharashtra
MVA : महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीने दिलेली पाच प्रमुख आश्वासनं काय? महिलांना किती पैसे दिले जाणार?
Eknath Shinde On Ladki Bahin Yojna
Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांची पोलीस भरती’, मुख्यमंत्र्यांचे १० मोठी आश्वासनं
Chandrapur district six constituencies, Chimur,
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत केवळ आठ महिला उमेदवार; चिमूर, ब्रम्हपुरीत एकही महिला रिंगणात नाही

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नड्डांची वापसी; अभाविप कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

निर्मला सीतारमण : निर्मला सीतारमण यांच्यावर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. सीतारमण यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यसभा खासदार सीतारमण मोदी 2.0 मध्ये अर्थमंत्री होत्या. त्यांना २०१४ मध्ये उद्योग आणि वाणिज्य खाते देण्यात आले होते. २०१७ मध्ये सीतारमण भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री होत्या. २०१९ मध्ये सत्तेवर परत आल्यानंतर, त्यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्या ही जबाबदारी पूर्णवेळ सांभाळणार्‍या पहिल्या महिला मंत्री ठरल्या. त्यांच्या अगोदर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काही काळ अर्थखाते सांभाळले होते.

अन्नपूर्णा देवी : झारखंडमधून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या आठ नेत्यांमध्ये अन्नपूर्णा देवी यांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) यादव समुदायातील असलेल्या अन्नपूर्णा देवी यांनी कोडरमामध्ये सीपीआय (एमएल) लिबरेशनच्या विनोद कुमार सिंग यांचा ३,७७,०१४ मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला. १९९८ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते राहिलेले त्यांचे पती रमेश यादव यांच्या निधनानंतर त्या राजकारणात आल्या. त्यांनी आपल्या निवडणूक कारकिर्दीची सुरुवात आरजेडीबरोबर केली. कोडरमामधून त्यांनी अनेक वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या. २०१२ मध्ये त्यांनी झारखंड सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले. २०१९ साली भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी देवी झारखंडच्या आरजेडीप्रमुख होत्या. त्या वर्षी, त्यांनी लोकसभेत पदार्पण केले आणि भाजपाच्या तिकिटावर लक्षणीय फरकाने कोडरमा जागा जिंकली.

अनुप्रिया पटेल : अनुप्रिया पटेल या एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या अपना दल (सोनेलाल) च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर लोकसभा जागा जिंकली आणि समाजवादी पार्टीचे (सपा) उमेदवार रमेश चंद बिंद यांचा ३७ हजार पेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला. विशेष म्हणजे, या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाची जागा दोनवरून एकवर आली आहे. २०२१ मध्ये त्या वाणिज्य राज्यमंत्री राहिल्या आहेत.

शोभा करंदलाजे : शोभा करंदलाजे यांनी दुसर्‍यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या हिंदुत्वाबद्दलच्या त्यांच्या स्पष्ट मतांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी बंगळुरू उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या राजीव गौडा यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्या बंगळुरूमधील पहिल्या महिला खासदार ठरल्या. त्यांनी कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. करंदलाजे या मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री होत्या.

मोदी 3.0 मधील नवीन चेहरे

रक्षा खडसे : रक्षा खडसे या महाराष्ट्रातील रावेरमधून तीन वेळा खासदार राहिल्या आहेत. रक्षा खडसे या भाजपाचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून असून, त्यांना सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामाचा अनुभव आहे. त्या संगणक विज्ञान पदवीधर असून, त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिलशी झाला होता, ज्यांनी २०१३ मध्ये आत्महत्या केली. हीना गावित आणि रक्षा खडसे या २०१४ मध्ये सर्वात तरुण खासदार ठरल्या. रावेरमधून खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) श्रीराम पाटील यांचा २.७२ लाख मतांनी पराभव केला. या वर्षाच्या अखेरीस अपेक्षित असलेल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश महत्त्वाचा आहे.

निमुबेन बांभनिया : बांभनिया यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाच्या तिकिटावर गुजरातमधून लोकसभेवर निवडून आलेल्या तीन महिला उमेदवारांपैकी बांभनिया या एक आहेत. त्यांनी भावनगर लोकसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या उमेश मकवाना यांच्या विरोधात ४.५ लाख मतांच्या उल्लेखनीय फरकाने विजय मिळवला. भावनगरच्या माजी महापौर, बांभनिया यांनी २००४ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी २०१३ ते २०२१ दरम्यान भाजपा महिला मोर्चाच्या गुजरात युनिटच्या उपाध्यक्षा म्हणून काम केले.

हेही वाचा : विनोद तावडे, अनुराग ठाकूर ते बी. एल. संतोष; कोण होणार भाजपाचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष?

सावित्री ठाकूर : सावित्री ठाकूर यांनीदेखील मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मध्य प्रदेशातील प्रमुख आदिवासी नेत्या असलेल्या ठाकूर यांनी धार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या राधेश्याम मुवेल यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. ठाकूर या दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांना ‘दीदी’ म्हणून ओळखले जाते. आदिवासी आणि गरीब महिलांच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक दशकाहून अधिक काळ काम केल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना धार लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या या जागेवरून त्या विजयी झाल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. मात्र, त्या राज्यमंत्री म्हणून लोकसभेत परतल्या आहेत.