पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत असून १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नीट पेपरफुटी प्रकरण, रेल्वे सुरक्षा यांसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता या अधिवेशनात आहे.

९० वर्षे जुन्या विमान कायद्याला बदलण्यासाठीच्या विधेयकासह सहा विधेयके अधिवेशनात सादर केली जातील, त्याशिवाय केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>मुंबई अदानींचे शहर होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांचा इशारा; ‘धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच’

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अधिवेशनादरम्यान कोणते मुद्दे मांडायचे आहेत हे समजून घेण्यासाठी संसदेतील राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. सीतारामन सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षणही मांडणार आहेत.

कामकाज सल्लागार समितीमध्ये सावंत

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सल्लागार समिती स्थापन केली आहे़ सभागृहाच्या कामकाजाबाबत ही समिती धोरण ठरवेल़ बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा समावेश आहे.