कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेचा फटका शेजारच्या गजापूर, मुस्लिमवाडीला बसून हे अवघे गाव भर पावसात पेटत राहिले. इथला प्रकार आता थांबला असला तरी राजकीय चिखलफेकीचा धुडघूस मात्र सुरूच आहे. आरोप -प्रत्यारोपाच्या गदारोळात मूळ प्रश्नाचे गांभीर्य हरवत चालले आहे. पुढील काळात हा प्रश्न राजकीय पातळीवर तापत राहील अशी व्यवस्था सर्वपक्षीय राजकारण्यांनी चालवली असल्याने त्याची राजकीय धग धुमसत राहील असेच दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किल्ले विशाळगड येथे अतिक्रमणे वाढू लागल्यानंतर त्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक बनल्या होत्या. या प्रश्नात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी अतिक्रमण हटवण्याबाबत राज्य शासन, जिल्हा प्रशासन निष्क्रिय ठरल्याचा आरोप करीत शिवप्रेमींना रविवारी गडावर येण्याचे आवाहन केले. विशाळगडावर रविवारी सकाळी दगडफेकीचा प्रकार घडला. गडावरील स्थानिकांनी शस्त्र घेऊन धमकावल्याचा आरोप हिंदुत्ववाद्यांनी केला. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून गडाच्या पायथ्याशी असलेल्या हजारो शिवप्रेमींमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटली. जखम विशाळगडची असताना ती चिघळली तीन किमी अंतरावर असणाऱ्या गजापूर, मुसलमान वाडीत. येथील घरे, दुकाने, वाहने यांची नासधूस, मारहाणीच्या हिंसक घटना घडल्या. शस्त्रे परजत हैदोस डोळ्यादेखत सुरु असताना पोलीस प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली.

हेही वाचा – कोट्यवधींच्या तांदूळ चोरी प्रकरणात अटक झालेले भाजपा नेते कोण? काय आहे प्रकरण?

गडावर मोठ्या संख्येने लोक येणार असल्याची समाजमाध्यमातून चर्चा असताना प्रशासन ढिम्म राहिले. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही बोट ठेवले असून त्यांनी विशाळगडावर येऊन राहिलेला यासीन भटकळपासून ते निष्क्रिय पोलीस प्रशासनाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नाकर्तेपणामुळेच विशाळगडचा प्रश्न तापल्याची टीका हिंदुत्ववादी संघटनांनी चालवली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करताना विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दबावामुळेच विशाळगडावरील अतिक्रमण निघण्यास विलंब झाल्याचा आरोप केला आहे. या साऱ्या गदारोळात आजवर धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे मुश्रीफ हे महायुतीच्या भगव्या छावणीत गेले असल्याने अशा बिकट प्रसंगी नेमकी कोणती भूमिका घ्यायची या पेचात अडकलेले दिसतात.

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील बेदिलीचे दर्शन विशाळगड प्रश्नावरून दिसले. संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर विध्वंस सुरु होता. त्यांच्या समर्थकांच्या समाजमाध्यमात लढाई जिंकल्याप्रमाणे अभिनंदनाचा वर्षाव होत राहिला. इकडे, उद्ध्वस्त झालेल्यांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले खासदार शाहू महाराज यांना या प्रकारावरून दुःख व्यक्त करीत दिलगिरी व्यक्त करावी लागली. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विशाळगड, गजापूर येथे जाऊन नुकसान झालेल्यांना मदतही देऊ केली. विशेष म्हणजे विशाळगडावर दंगलखोरांना बिनभोबाट सोडले गेले असताना मदत करण्यासाठी जाणाऱ्यांना अडवण्याची अजब किमया जिल्हा प्रशासन – पोलीस दाखवत होते.

हेही वाचा – अजित पवारच का लक्ष्य ?

हा मुद्दा विरोधकांना पुरला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते सतेज पाटील यांनी विशाळगड हिंसाचार हे राज्य सरकारचे अपयश आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रश्न उद्भवल्याची टीका त्यांनी केली. त्यावर लगेचच भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांनी केलेली मदत म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असल्याची टीका केली आहे. तीन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात शाळकरी मुलांच्या वाहनावर दगडफेक झाली, तेव्हा त्यांचे अश्रू शाहू छत्रपती, सतेज पाटील यांना दिसले नाहीत का, संभाजीराजे छत्रपती हे इंडिया आघाडीचे नेते असताना त्यांना रोखले का नाही, एकाच घरातील शाहू छत्रपती – संभाजी महाराज यांच्या दोन भूमिका चालतात कश्या, असे प्रश्न उपस्थित करून महाडिक यांनी विरोधकांची राजकीय कोंडी केली आहे.

मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, बाबा इंदुलकर यांनी विशाळगडावरील घरे जळत असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ कोठे होते, संभाजीराजे यांनी कोल्हापुरातील एकीला कलंक लावला आहे. त्यांची भूमिका समाजात फूट पाडणारी आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या काळात तीन वेळा कोल्हापुरात दंगल घडली असून यामागे नेमके कोणाचे डोके आहे, अशी विचारणा करण्यात आली. उशिरा शहाणपण आल्यांनतर अतिक्रमणांनावर हातोडा घातला जात असताना विशाळगड प्रश्नावरून रोजच आरोपांचा वर्षाव सुरु असताना त्यात हिंसाचारात भिकेकंगाल झालेल्यांचे अश्रू वाहून जात आहेत.