नीरज राऊत

पालघर (राखीव) लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गट की भाजपकडे जातो यावरच बरीच समीकरणे अवलंबून आहेत. तरीही या मतदारसंघात उमेदवारीसाठी दहापेक्षा अधिक जण इच्छूक आहेत.

Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
Congress city presidents strength for rebellion in Thane
ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ?
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
bjp expels rebel candidates in amravati
कारवाईची कुऱ्हाड, अमरावती जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांची भाजपातून हकालपट्टी

लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये फेरचना झाल्यानंतर पालघरच्या खासदारकीवर बहुजन विकास आघाडीने विजय मिळविला होता. मात्र २०१४ मध्ये मोदी लाटेचा प्रभाव महत्त्वपूर्ण ठरल्याने भाजपातर्फे अॅड. चिंतामण वनगा विजयी झाले होते. चिंतामण वनगा यांच्या अकस्मात निधनानंतर २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस मधून भाजपात प्रवेश करत राजेंद्र गावित यांनी वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास (शिवसेना) यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने राजेंद्र गावित हे शिवसेनेतून निवडणूक लढवून विजयी झाले होते.

आणखी वाचा-महिला आरक्षण : राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडूनही ‘पुरुषप्रधान’ शिक्का पुसण्याचा प्रयत्न 

पालघरची जागा शिवसेनेकडे कायम राहिल्यास राजेंद्र गावित यांना उमेदवारी पुन्हा देण्यास प्राधान्य मिळेल अशी शक्यता आहे. मात्र गावित यांच्या विद्यमान खासदारकीच्या कारकिर्दीत मतदारांवर छाप पडेल अशी कामगिरी झाली नसल्याचे पक्षांतर्गत आरोप होत असून जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष प्रकाश निकम, भारती कांबळी, वैदेही वाढाण यांच्या नावाची देखील खासदारकी उमेदवारासाठी चर्चा सुरू आहे.

पालघर हा मुळात भाजपाचा मतदारसंघ असल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याचा विचार करता भाजपाला पालघरची जागा मिळावी यासाठी पक्षीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पालघर लोकसभा क्षेत्रात विशेष प्रभाव नसल्याचा दावा करत भाजपाला पालघरच्या जागेवर विजय संपादन करण्यास अधिक सोयीचे ठरेल यासाठी मतांची गणिते वरिष्ठांकडे मांडली जात आहे. असे झाल्यास खासदारकी टिकवण्यासाठी विद्यमान खासदारांना पुन्हा पक्षांतर करणे अनिवार्य ठरेल. मात्र याबाबत जिल्ह्यामधील पक्षीय कार्यकर्ते अनुकूल नसल्याचे एकंदर मत पुढे येताना दिसते.

आणखी वाचा-‘हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात,’ कॅनडाचा भारतावर गंभीर आरोप, पंजाबमधील पक्षांची भूमिका काय?

पालघरची जागा भाजप लढवेल असे आश्वासन देऊन बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार विलास तरे यांना भाजपात पक्षप्रवेश घेण्यात आला होता. त्याचबरोबर माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णु सावरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सावरा हे देखील खासदारकीसाठी इच्छूक आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा थेतले व भाजपाचे लोकसभा प्रभारी संतोष जनाठे यांची नावे देखील भाजापा तर्फे चर्चेत आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला विरोधकांची कितपत साथ लाभेल तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाची भाजपा विरोधी भूमिका किती कार्यकर्ते घेतील हा प्रश्न महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सामाजिक संस्था म्हणून नोंदलेल्या जिजाऊ संघटनेने राजकीय पक्ष नोंदवला असून या पक्षाच्या राजकीय आकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत या संघटनेचे कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात हे देखील महत्त्वपूर्ण राहणार आहे.

एकंदरीत पालघर लोकसभेसाठी किमान १० ते १२ इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेला आली असून या उमेदवारांकडून मतदारसंघाचा दौरा व त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. पक्षांमध्ये आपल्या नावाची शिफारस व्हावी या दृष्टीने पक्षीय पदाधिकारी मंडळ अधिकारी यांच्या नेमणुकीसाठी विशेष प्रयत्न केले गेल्याचे चित्र आहे.