Sandeep Bajoria in Morshi Vidhan Sabha Constituency अमरावती : मोर्शी मतदारसंघातून भाजपने उमेदवार जाहीर केल्याने वेगळाच पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवार यांनी आपल्याला एबी फॉर्म दिल्याची माहिती देवेंद्र भुयार यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना दिली. दुसरीकडे, देवेंद्र भुयार यांच्या विरोधात भाजपने उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भाजपने या जागेसाठी आग्रह धरला होता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेश यावलकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले होते. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध दर्शवला होता. त्यामुळे मोर्शीच्या जागेवरून महायुतीत ताणाताणी सुरू होती. राष्ट्रवादीने देवेंद्र भुयार यांच्यासाठी हिरवा कंदिल दिला. त्याचवेळी सोमवारी दुपारी भाजपने उमेश यावलकर यांच्या नावाची घोषणा केली, त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने अशी स्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र भुयार यांनी आपण राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढत देत मोर्शी मतदारसंघात विजय मिळवला होता. या निवडणुकीत भुयार यांनी दोन वेळा आमदार राहिलेल्या तत्कालीन कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. बोंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. मात्र देवेंद्र भुयार यांनी त्यांचा ९ हजार ७९१ मतांनी पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला होता. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर भुयार यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. पण, गेल्या अनेक दिवसांपासून ते उमेदवारीच्या प्रतीक्षेत होते.
हेही वाचा >>>Raver Vidhan Sabha Constituency: रावेरमध्ये शिरीष चौधरी, हरिभाऊ जावळे यांच्या राजकीय वारसदारांमध्ये लढत
राजकुमार पटेल प्रहारमध्ये?
प्रहारमधून बाहेर पडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यासमोरील अडचणी अजूनही कायम आहेत. प्रहार जनशक्ती पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांना महायुतीच्या उमेदवारीची अपेक्षा होती, पण मेळघाटमधून केवलराम काळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांची अडचण झाली. आता राजकुमार पटेल हे पुन्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते आता बच्चू कडू यांच्या परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते.