प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजकीयदृष्ट्या भाजपचे वर्चस्व असलेल्या अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ‘फायरब्रँड’ नेते बच्चू कडू यांच्याकडे असली तरी जिल्ह्याचे पालकत्व सांभाळताना बच्चू कडूं यांनी जरा मवाळ भूमिका घेतली आहे. विशेषत: बच्चू कडू यांच्याविरोधात वंचित आघाडी आक्रमक झाल्यानंतर भाजपच ‘ढाल’ होऊन समोर आले. त्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनाक्रमावरून बच्चू कडूं यांनी जिल्हा भाजपशी जवळीक साधल्याचे अधोरेखित होते. यामुळे महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

काय घडले-बिघडले

अकोला जिल्ह्यात भाजपचा खासदार व सहा आमदार आहेत. महापालिकेतही साडेसात वर्षांपासून भाजपची सत्ता होती. अकोला जिल्हा परिषद वगळता सर्वत्र भाजपचा दबदबा दिसून येताे. परंतु, गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात पालकमंत्री बच्चू कडू यांनी सगळ्यांशी जुळवून घेत विकास कामे करण्यावर भर दिला. दरम्यान, वंचित आघाडी व बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी पडली. रस्ते कामात एक कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीच्या कथित अपहार प्रकरणी कडू यांना वंचितने अडचणीत आणले. ती कामे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सुचवलेली आहेत. या प्रकरणांत बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर हे धावून आले. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विशेषत: शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नसताना अकोल्यात मात्र बच्चू कडू यांना  भाजपची साथ मिळाली. याआधीही बच्चू कडू यांना भाजपची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत मिळाली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रहारने अकोला जिल्हा परिषदेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे मूळगाव असताना कुटासा मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाल्याने बच्चू कडू यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप मिटकरींनी केला होता. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने दिमाखात ही जागा जिंकली. प्रहारच्या या विजयात भाजपने अप्रत्यक्ष हातभार लावल्याची राजकीय वर्तुळातही चर्चा होती. त्यानंतर जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने थेट प्रहारच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने सभापती पदाच्या निवडीत त्यांनी बाजी मारली. शहरातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. या कार्यक्रमात कडू आणि भाजप नेत्यांचे सुरात सूर मिळत असल्याचे दिसून आले.

अकोला जिल्ह्यात कडू आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांसाठी पोषक भूमिका घेतली आहे. विरोधक म्हणून भाजप लोकप्रतिनिधींच्या कामाला पालकमंत्री म्हणून कडू यांनी कधी अडवले नाही. उलट त्यांनी प्राधान्यक्रमाने भाजपच्या लोकप्रतिनिधींची कामे मार्गी लावली. दुसरीकडे नेहमीच छोट्या-मोठ्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या अकोला जिल्हा भाजपने कधी बच्चू कडूंविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली नाही. परस्पर हितासाठी बच्चू कडू आणि भाजप नेते सामंजस्य ठेवून असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबाबत अनेकदा जाहीर नाराजी देखील व्यक्त केली. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात फारसे वजन नसल्याने त्यांची दखल घेतलीच गेली नाही. प्रहारच्या स्थानिक नेत्यांना मात्र भाजपसोबतच्या सहकार्याची चर्चा मान्य नाही. भाजप नेत्यांच्या समर्थनाचा काही वेळा फक्त योगायोग जुळून आला आहे. वंचितने आरोप केलेल्या रस्त्यांची कामे भाजप लोकप्रतिनिधींनीच सुचवली होती. त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. कडू यांची भाजपशी कुठलीही जवळीक नाही, असा दावा प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खुमकर यांनी केला.

संभाव्य राजकीय परिणाम

अकोला जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेचे जिल्ह्यात नव्याने संघटनात्मक जाळे विणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत त्यांनी एका जागेवर यश मिळवून सभापतीपद प्राप्त केले. आता महापालिका निवडणुकीच्या आखाड्यातही प्रहार उतरणार आहे. या राजकारणातही बच्च कडू व भाजप ही अदृष्य युती राहिल्यास एकमेका साह्य करू दोघे धरू सुपंथ या त्यांच्या राजकारणात महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना यांची कोंडी होणार आहे.