सांगली : शिमगा झाला तरी त्यांचे कवित्व प्रदीर्घ काळ, प्रसंगी पुढचा शिमगा येईपर्यंत कायम राहाते या प्रमाणे हातकणंगले मतदार संघात झालेल्या महायुती आणि महाविकास आघाडीतील खासदार धैर्यशील माने आणि बाबासाहेब पाटील सरूडकर यांच्या लढतीबाबत मानले जात आहे. वाळवा येथे क्रांतीवीर पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जयंती दिनी झालेल्या कार्यक्रमात खासदार. माने यांनी आपल्या विजयामध्ये अदृष्य शक्तीचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. एवढ्यावरच ते थांबले असले तर फारसी चर्चा झाली नसती. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शिवाजीराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ‘होता जिवा म्हणून वाचला शिव“ असेही कथन करून चर्चेला तोंड फोडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> काँग्रेसच्या फुटीरांमध्ये अशोक चव्हाण यांच्या समर्थकांचा समावेश ?

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असूून या पार्श्‍वभूमीवर खासदार माने यांचे वक्तव्य शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये पडद्याआड झालेल्या हालचाली महत्वपूर्ण ठरणार आहेत. गत निवडणुकीमध्ये नाईक भाजपचे उमेदवार होते. गेल्या वर्षी त्यांनी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे शिराळ्याचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा राजकीय प्रवास बिनधोक झाल्याचे मानले जात असले तरी याला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील मतदानाची किनार आहे. आमदार नाईक यांना जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद देउन वाळवा, शिराळा तालुक्यात ताकद देण्याचा प्रयत्न केला असला तरी मतदार संघावर आपलाच शब्द प्रमाण राहील अशी व्यूहरचना केली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान, आमदार नाईक यांनी पक्षआदेश डावलल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी केला आहे. यामुळे आमदार नाईक यांच्या निष्ठेबाबत संशय निर्माण झाला आहे. हा संशय दूर करण्यासाठी तेही अद्याप पुढे आलेले नाहीत, अथवा आमदार जयंत पाटील यांच्याकडूनही याबाबत काहीच भाष्य केलेले नाही. यामुळे शिराळा मतदार संघात यापुढे राजकीय फेरमांडणीची शक्यताही नाकारता येत नाही असे दिसते.

हेही वाचा >>> नगरमध्ये भाजपचे विवेक कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

याच पार्श्‍वभूमीवर खासदार माने यांचे वक्तव्य आघाडी आणि युतीमध्ये संशयाचे वावटळ निर्माण करणारे ठरू शकते. मतदार संघातून गत निवडणुकीमध्ये अपक्ष मैदानात येउन ५० हजार मतदान घेणारा महाडिक गटही यावेळी ताकदीने विधानसभेच्या तयारीत आहे, तर भाजपचे लोकसभा मतदार संघ प्रचार प्रमुख सत्यजित देशमुख यांचेही आमदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या दोघामध्ये कोणाला संधी मिळेल हे अद्याप अस्पष्ट असले तरी वजाबाकीतून बेरीज साधण्याचे प्रयत्न भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू आहेत. दोन गट एकत्र आल्याविना विजयाचे शिखर सर करता येत नाही याची जाणीव दोन्ही गटांना आहे. यात आमदार जयंत पाटील यांचे आंबड कोणाच्या पारड्यात जाते हे महत्वाचे ठरणार आहे.

अशी स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे ज्या मतदार संघात आमदार होते त्या जागा आम्ही घड्याळ चिन्हावर लढणारच अशी भूमिका घेतली आहे. यामुळे त्यांच्या गटाचाही उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता दिसत असताना जागा वाटप कसे होते यावरच पुढील राजकारणाची दिशा आण दशा समोर येईल असे वाटते.

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना शिराळा मतदार संघामध्ये ८० हजार ७३० मते मिळाली, तर महायुतीतील शिवसेना ठाकरे गटाचे बाबासाहेब पाटील यांना ९० हजार मते मिळाली. कागदावर पाहता या मतदार संघात महाविकास आघाडीचे प्राबल्य दिसत असले तरी ९ हजार २८१ इतके मताधिक्य गावपातळीवर मोठे आहे असेही म्हणता येणार नाही. यातच मानेंना मदत करणारी अदृष्य शक्ती कोणाच्या मदतीला धावते हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.