भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांची जीभ घसरली आहे. त्यांनी सोमवारी खंडवा जिल्ह्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात एका व्यक्तीला थेट धमकी दिली आहे. संबंधित व्यक्तीने वनमंत्री शाह यांना प्रश्न विचारला होता. यावर संताप व्यक्त करताना वनमंत्र्यांनी अपशब्द वापरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वनमंत्री विजय शाह अपशब्द वापरताना दिसत आहेत. तसेच प्रश्न विचारणारी व्यक्ती दारुच्या नशेत असल्याचंही शाह म्हणत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा- गर्दीमुळे मुख्यमंत्री तर, कामांच्या मंजुरीने आमदार कांदे सुखावले

“आम्ही मध्य प्रदेशात विकासाचे युग सुरू करत आहोत. या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, अथवा तुरुंगात टाकू. तसेच पोलिसांच्या हातून पार्श्वभागावर फटके मारले जातील. हा सरकारी कार्यक्रम आहे” असा धमकीवजा इशारा शाह यांनी दिला.

खरं तर, संबंधित व्यक्तीने अंगणवाडी केंद्रात काम करणाऱ्या आपल्या पत्नीला गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळाला नाही, असा दावा केला होता. याबाबत प्रश्न विचारताच वनमंत्री विजय शाह यांचा संताप अनावर झाला. त्यांनी भरसभेत संबंधित व्यक्तिविरोधात अपशब्द वापरले. शिवाय प्रश्न विचारणारी व्यक्ती दारू पिऊन कार्यक्रमस्थळी आल्याचा आरोप शाह यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp forest minister vijay shah abused man who asked question in rally rmm