मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री तसंच भाजपा नेत्या उमा भारती यांच्यात शीतयुद्ध असल्याच्या बातम्या काही नव्या नाहीत. मागच्या १७ वर्षांपासून हे शीतयुद्ध सुरूच आहे. त्यांनी एकमेकांविरोधात केलेली वक्तव्यं चर्चेत येतात. परत काही दिवसांनी हा वाद शमला आहे असं वाटतं. पण या दोघांच्या वादाचं एक कारण नाही तर अनेक आहेत. अर्थात सार्वजनिक मंचावर आम्ही बहीण भाऊ आहोत आमचं नातं खूप छान आहेत हे दोघंही सांगतात. पण या दोघांमध्येही शीतयुद्ध आहेच.

२००३ मध्ये काय घडलं?

२००३ पर्यंत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. मात्र दिग्विजय सिंह यांची सत्ता उलथवण्यात उमा भारती यांचा सिंहाचा वाटा होता. ज्यानंतर त्यांना मध्य प्रदेश भाजपाचं प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं, त्यानंतर त्या मुख्यमंत्री झाल्या. माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची आणखी एक खासियत अशी की त्यांनी कायमच संघर्ष निवडला आहे. त्यामुळेच त्यांनी केंद्रीय मंत्रीपद मिळूनही वर्षभरातच ते पद सोडलं. २००३ मध्ये दिग्विजय सिंह यांची सत्ता गेली ती नंतर येऊ शकली नाही.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
nitin Gadkari constitution of India
Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!

२००४ मध्ये राजीनामा

भाजपाचं सरकार आल्यानंतर मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून उमा भारती यांची निवड झाली. मुख्यमंत्री होताच उमा भारती यांनी भाजपातल्या लोकांना जी मंत्रिपदं हवी होती ती दिली. सरकार नीट चाललं होतं. पण वर्षभरानंतर १९९४ च्या एका प्रकरणात हुबळी कोर्टाकडून एक वॉरंट जारी झाला. या वॉरंटमुळे उमा भारती यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी जमीन तयार होत होती. ते आधी मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आपल्या कार्यशैलीने शिवराज सिंह चौहान यांनी चारवेळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आपलं नाव कोरलं. या दरम्यान उमा भारती आणि शिवराज सिंह चौहान यांच्यात थेट सामनाही पाहण्यास मिळाला.

दोघांमधले मतभेद कसे सुरू झाले?

उमा भारती मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या लोकांना चांगली खाती दिली होती. मात्र शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाल्यानंतर उमा भारतीच्या जवळच्या लोकांना साईडलाईन करण्यात आलं. यावेळी या दोघांमध्ये पहिली ठिणगी पडली. उमा भारती यांच्या मनात एक सल कायम राहिली की आपण दिग्विजय सिंह यांची सत्ता उलथवून टाकली पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आपल्याला फार काळ मिळाली नाही. खरंतर शिवराज सिंह चौहान हे उमा भारती यांना बरेच ज्युनिअर आहेत कारण ज्यावेळी उमा भारती खजुराहोच्या जागेवरून खासदार झाल्या होत्या त्यावेळी शिवराज सिंह चौहान हे विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. उमा भारती जेव्हा मुख्यमंत्री झाल्या होत्या तेव्हा त्यांनी मध्यप्रदेशात गाय, गाव, गरीब किसान हा नारा दिला होता. मात्र हा नाराही हळूहळू हटवण्यात आला. ही सलही त्यांच्या मनात राहिली होती.

सध्याच्या घडीला दारूबंदीच्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये छुपा संघर्ष सुरू आहे. उमा भारती एकीकडे दारूबंदीची मागणी करत आहेत किंवा त्याविषयीचं एक धोरण ठरवायची मागणी करत आहेत तर दुसरीकडे शिवराज सिंह चौहान याकडे काहीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये आपोआपच नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काही तरी वाद रंगतो आणि हे दोघं चर्चेत येतात. शिवराज सिंह यांची झालेली प्रगती ही उमा भारतींना खपत नाही असंही काही नाही. कारण त्या बऱ्याच वरिष्ठ नेत्या आहेत. पण आपण या सगळ्या गोष्टी उपभोगू शकलो नाही याची खंत त्यांना जास्त वाटते त्यामुळेच या दोघांमध्ये मागच्या १७ वर्षांपासून शीत संघर्ष सुरूच आहे.