नीरज राऊत

पालघर : पालघरच्या खासदारपदी शिवसेनेचे राजेंद्र गावित असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येईल असा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने मुसंडी मारली असून ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तसेच मनोर या मध्यवर्ती भागामध्ये वॉर रूम स्वरूपात लोकसभा संपर्क कार्यालय कार्यन्वित आहे.

Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Thane, Palghar, Eknath Shinde,
ठाणे, पालघरमध्ये शिंदे यांची भिस्त आयात उमेदवारांवर ?
Shrinivas Vanga, MLA Shrinivas Vanga, Palghar,
पालघरमध्ये आमदार श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी टांगणीवर
NCP Ajit Pawar candidate for existing MLAs in Pune district Pune news
वर्चस्वासाठी विद्यमानच वरचढ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पुणे जिल्ह्यात सावध पवित्रा
Kedar Dighe and Eknath Shinde
Kopari Pachpakhadi : कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!
Sanjay Kelkar Thane, Thane Shivsena support,
ठाण्यात संजय केळकर यांच्याकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न
Hadapsar, nana bhangire, activists on the streets,
नेत्याच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिक पायी निघाले, वाचा सविस्तर…

सन २०१४ मध्ये भाजपाच्या चिंतामण वनगा यांनी पालघर ची जागा बहुजन विकास आघाडी कडून खेचून घेतली होती. सन २०१८ मध्ये त्यांच्या अकस्मात निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर राजेंद्र गावित हे विजयी झाले होते. सन २०१९ मध्ये पालघर लोकसभेची जागा शिवसेनेकडे गेल्याने राजेंद्र गावित यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवून विजयी झाले होते.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून पालघरची जागा शिवसेनेकडे राहील असा दावा शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. खासदार राजेंद्र गावित यांनी देखील आपल्या मतदारसंघात लोकसंपर्क वाढविला असून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

आणखी वाचा-मंत्री संजय राठोड यांची कन्याही राजकारणात

शिवसेने सोबत असणाऱ्या भाजपाने ऑगस्ट महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये संपर्क कार्यालय सुरू केली आहेत. त्याचबरोबर येथे लोकसभा संपर्क कार्यालयाची स्थापना करून नोव्हेंबर महिन्यात या सर्व कार्यालयांचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक कार्यालयात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून “वॉर रूम” प्रमाणे प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून पालघर लोकसभेच्या दृष्टिकोनातून इतर पक्षांच्या तुलने भाजपाने तयारीत मुसंडी मारली आहे.

भाजपाच्या या संपर्क कार्यालयांमध्ये निवडणूक मतदार नोंदणी व समाज माध्यमांशी संबंधित अनेक कामे हाती घेण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या चलन वळणासोबत माहिती संकलित करणे, ऑनलाईन पद्धतीने नवीन मतदारांची नोंद करणे, मतदारांच्या नोंदींवर आक्षेप घेणे इत्यादी काम केली जात आहेत. या कार्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन ऑनलाईन पद्धतीने विविध योजनांकरिता लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्याचे काम देखील केले जात असून मतदारांशी जवळीक साधण्यासाठी भाजपाने गाव- खेड्यात संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

विशेष म्हणजे यापैकी अधिक तर कार्यालयांचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येऊन या संपर्क कार्यालयांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी तसेच बुध स्तरावरील आखणी, बुथ समितीची निर्मिती व सरल ॲप द्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पालघर जिल्ह्यातील भाजपा प्रयत्न करीत आहे.

आणखी वाचा-औसा मतदारसंघात नव्या दमाने पुन्हा दिनकर माने मैदानात

अलीकडे झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची शिंदे गटाची पीछेहाट झाली असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशाच परिस्थितीत भाजपाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी मुसंडी मारल्याने शिवसेना गोटात अस्वस्थता निर्माण झाली. पालघरची जागा युतीमध्ये असलेल्या कोणत्या पक्षाकडे जाईल याबाबतचा निर्णय आगामी काही महिन्यात होणार असला तरीही भाजपाने सुरू केलेले लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी इतर सर्व प्रतिस्पर्धी पक्षांसाठी लक्ष वेधून घेत आहे.

राज्यात सत्तेमध्ये असलेले मित्रपक्ष हे आगामी निवडणूक एकत्रितपणे लढणार हे निश्चित आहे. पालघर ची जागा शिवसेना (शिंदे गट) कडे असल्याने त्यांच्याकडे कायम राहील अशी अपेक्षा आहे. या बाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल तो मान्य असेल. -खासदार राजेंद्र गावित, पालघर

भाजपाने राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली असून त्याच धर्तीवर पालघर जिल्ह्यात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदारांपर्यंत पोहोचणे नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच कार्यकर्त्यांशी संपर्क साधून बूथ निहाय समिती स्थापन करण्याचे काम सध्या जिल्ह्याभरात सुरू आहे. -नंदकुमार पाटील, लोकसभा निवडणूक प्रमुख पालघर (भाजपा)