मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

गर : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांचे सध्या मतदारसंघात मोफत साखर व चणाडाळ वाटपाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता. आता पुन्हा त्यांनी जनसंपर्कासाठी साखर व चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pune Pigeon grain, Pune Pigeon,
पुणे : पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वसूल केला इतक्या हजारांचा दंड !
sangli 144 ton sugarcane production
एकरी १४४ टन उसाचे उत्पादन, सांगलीतील सहदेव पाटील यांचा विक्रम
Sudhir Mungantiwar minister post , Sudhir Mungantiwar Chandrapur, Sudhir Mungantiwar latest news,
गटबाजी, कुरघोडीच्या राजकारणामुळे मुनगंटीवार मंत्रिपदाला मुकले!
Devendra Fadnavis Nagpur, Cabinet Expansion Nagpur,
‘विजेता तू.. देवाभाऊ.. चल पुढे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत
Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था

त्यांच्या या मोफत वाटप कार्यक्रमाची स्वपक्षासह विरोधी पक्षालाही दखल घ्यावी लागत आहे. गेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाफेडची चणाडाळ सवलतीच्या दरात वितरित केली होती. त्यावेळी ८५ रुपये किलोचा भाव असलेली चणाडाळ भाजपने ६० रुपये दराने विक्री करण्याचा कार्यक्रम काही ठराविक ठिकाणीच राबवला होता. केंद्र व राज्यातील सत्ताधारी, सर्वात मोठा व सर्वात श्रीमंत असलेल्या भाजप पक्षालाही महागडी डाळ सरसकट मोफत देणे शक्य झाले नव्हते. ते काम आता त्यांच्याच पक्षाचे खासदार करून दाखवत आहेत, तेही गावोगांवांमध्ये.

दिवाळीच्या काळात महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात पाच किलो साखर वाटपाचा कार्यक्रम खासदार विखे यांनी राबवला होता. परंतू विखे खासदार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार असताना साखर वाटप मात्र जिल्ह्याच्या उत्तर भागात करत आहेत, ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले, त्यांना मात्र वंचित ठेवल्याची टीका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाल्याने दिवाळीनंतर त्यांनी नगर दक्षिण मतदारसंघातही मोफत साखर वाटप सुरू केले.

आणखी वाचा-आमदार विश्वजित कदम यांची कोंडी करण्याची भाजपची व्यूहरचना

मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम राबवतानाही खासदार विखे यांनी वेगवेगळी वक्तव्य करत त्याचे समर्थन केले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी, आमची साखर काहींना गोड लागेल तर काहींना कडू लागेल, ज्यांना कडू लागेल त्यांनी ती घेऊ नये असे ते सांगत. विशेषतः स्वपक्षासह जेथे विरोधक प्रबळ आहेत, त्या विधानसभा मतदारसंघात, त्या गावात हे वक्तव्य त्यांनी आवर्जून केले आहे. जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत, जनसंपर्कासाठी मोफत साखर वितरित केली जात असल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागल्याने खासदार विखे यांनी, आम्ही मते देण्यासाठी साखर वाटप करत नाही तर आमच्यामध्ये दानत आहे, इतरांकडे दानत नसल्यामुळे ते मोफत वाटप करत नाहीत, अशी भूमिका घेतली.

अलीकडच्या काळात आता त्यांनी चार किलो साखरेबरोबर एक किलो चणाडाळ मोफत देण्यास सुरुवात केली आहे. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे, त्यावेळी दिवाळी साजरी करा, दिवाळी साजरी करताना या साखर व डाळीचा वापर करून बनवलेले लाडू प्रसाद म्हणून वाटप करा, असे खासदार विखे सांगत आहेत. श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मोफत साखर वाटप याचा असा मिलाफ खासदारांकडून घातला जात आहे.

आणखी वाचा-खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रवास खडतर वाटेवर?

काही ठिकाणी त्यांचे साखर व चणाडाळ वाटपाचे कार्यक्रम वादग्रस्तही ठरत आहेत. शेवगावमध्ये वाटप करणारा ट्रक अडवला गेला. साखर न मिळाल्याने नागरिकांनी रास्तारोको केले. मोदी सरकारचा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आडवला, त्याच्यापुढे कांदे ओतले, गावात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला. मात्र असा विरोध विखे यांच्या मोफत साखर वाटपाच्या कार्यक्रमास कोठे झालेला नाही हे विशेष. विकास कामांचे भूमिपूजन-उद्घाटन अशा कामाचे औचित्य साधत साखर वाटप कार्यक्रम राबवला जातो आहे. त्यासाठी कार्यक्रम ठिकाणी आगाऊ नोंदणी केली जाते. शिधापत्रिकांच्या झेरॉक्स घेऊन नंतरच मोफत साखर व चणाडाळ दिली जाते. त्यामुळे लाभार्थींपर्यंत वाटप होण्यास मदत होत असल्याचा दावा विखे समर्थक करतात तर मोफत वाटपाच्या कार्यक्रमामुळे कार्यक्रमाला गर्दी होण्यास मदत होते, असा विरोधकांचा दावा आहे. मात्र मोफत साखर व चणाडाळ वाटपाच्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे आणि नागरिकांनाही लोकसभा निवडणूक जवळ आल्याची जाणीव होऊ लागली आहे.

साखर मोफत वाटण्याची हिंमत आमच्यात आहे, आमची साखर ज्याला आवडत नाही त्यांनी ती घेऊ नये, आम्ही साखर वाटून मते मिळवणारे लोक नाहीत, आमचे जनतेशी असलेल्या ऋणानुबंधातून चार किलो साखर व एक किलो डाळ वाटण्याचे काम सुरू आहे. २२ जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने साखर व डाळ वाटप यापासून नागरिकांनी लाडू तयार करून आनंदोत्सव साजरा करावा. -डॉ. सुजय विखे, खासदार, भाजप

कांदा निर्यातबंदीने शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान, दुधाचे पडलेले दर, महागाई, बेरोजगारी याबद्दल संसदेत मौन बाळगणारे नगर जिल्ह्यात मात्र साखरपेरणी करत आहेत. ज्वलंत प्रश्नावर सरकार निर्णय घेत नसल्याने त्यांच्यावर साखर वाटपाची वेळ आलेली दिसते. त्यांनी आता हत्तीवरून साखर वाटप करावी. -आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

Story img Loader