हर्षद कशाळकर,

अलिबाग– खासदार सुनील तटकरे यांनी रविवारी माणगाव आणि म्हसळा येथे अल्पसंस्ख्यांक समाजाचे मेळावे घेतले. महायुतीत सहभागी झाल्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सर्वधर्मसमभावाचा विचार सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Nana Patole first reaction about leaving Congress and joining BJP before some years
“त्या नेत्यामुळे काँग्रेस सोडून भाजपात गेलो…” नाना पटोलेंनी पहिल्यांदाच…
Maharashtra Assembly Election 2024,
लातूरमध्ये काँग्रेसकडे वळलेल्या लिंगायत मतपेढीला भाजपची साद
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. यात खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचाही समावेश होता. या निर्णयामुळे आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात अस्वस्थता पसरली. श्रीवर्धन मतदारसंघ हा अल्पसंख्याक समाज बहूल मतदारसंघ मानला जातो. बॅ. अंतुले यांच्या पश्चात हा समाज कायमच तटकरे कुटुंबांच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे आधी सुनील तटकरे, नंतर अवधूत तटकरे आणि आता आदिती तटकरे या मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेल्या. लोकसभा निवडणूकीतही सुनील तटकरे यांच्या पाठीशी श्रीवर्धन मतदारसंघ ठामपणे उभा राहीला होता. ज्यात अल्पसंख्याक समाजाचा मोठा हातभार होता.

हेही वाचा >>> पैलवानाच्या तयारीने सांगलीत लढत तिरंगी होणार ?

तटकरे यांनी अचानक भाजपप्रणीत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील अल्पसंख्याक समाज नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच खासदार तटकरे यांची एक ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. ज्यात आगामी काळात जिथे जिथे भाजपच्या उमेदवार असतील तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना भाजपला मतदान करावे लागेल असे वक्तव्य तटकरे केल्याचे दिसून येत आहे. ही ध्वनीचित्रफीत श्रीवर्धन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर फिरण्यास सुरु झाल्याने, तटकरे यांनी तातडीने डॅमेज कन्ट्रोल उपाययोजनांना सुरुवात केली आहे.

मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाची नाराजी दूर करण्यासाठी तटकरे कुटूंबाने हालचाली सुरू केल्या आहेत. रविवारी माणगाव आणि म्हसळा येथे अल्पसंख्यांक समाजाचे मेळावे घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वधर्मसमभावाचे विचार सोडणार नाही. शाहू, फुले आंबेडकरांची विचारधारा सोबत घेऊन आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी झालो आहोत. पण आज काही जण समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी व्देश पसरविण्याचे काम काही जण जाणीव पुर्वक करत आहेत. पण महायुतीच्या सभेत राजकीय भुमिका घेत असतांना आमच्या भुमिकेपासून आम्ही तसूभरही बाजूला जाणार नाही, धर्मनिरपेक्ष विचारधारा सोबत घेऊन विकासकडे जाणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. काही जण माझ्या २० मिनटाच्या भाषणातील २० सेकंदाचा भाग समाजमाध्यमांवर प्रसारीत करून दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>> राहुल गांधी – प्रियांका गांधी यांच्यात तणाव? भाजपाचा दावा; काँग्रेसचे सडेतोड उत्तर; श्रीनेत म्हणाल्या, “डोळे आणि मेंदू …”

या दोन्ही मेळाव्यांना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मुखत्यार वेळासकर, आतिक खतीब, महम्मद मेमन, जुबेर अब्बासी, नाझीम हसवारे, अल्ताफ धनसे यांच्या सह दापोली आणि मंडणगड मधील अल्पसंख्याक समाजाचे नेते यावेळी उपस्थित होते. अल्पसंस्थाक समाजातील अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. गेल्या महिन्याभरात अलिबाग आणि महाड येथे घडलेल्या दोन घटनामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र या घटनामुळे अल्पसंस्थाक समाजात जी असूरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. ही असूरक्षितेची दूर करण्यासाठी तटकरे कुटूंबांनी या मेळावाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.

श्रीवर्धन मतदारसंघाचे महत्व…

श्रीवर्धन, म्हसळा, तळा पुर्ण तालुक्यांचा. माणगाव आणि रोहा या दोन तालुक्यातील काही भागांचा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात समवेश आहे. आदिती तटकरे या श्रीवर्धनच्या आमदार आहेत. तटकरे कुटूंबातील तीन आमदार या मतदारसंघातून सातत्याने विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे गेल्या दीड दशकात श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम संघटन असलेला असलेला हा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे.