२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीची मुंबई येथे दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे आम्ही आगामी लोकसभा निवडणूक शक्य तितक्या लवकर एकत्र लढवणार आहोत. त्यासाठी जागावाटपाच्या मुद्द्यावर राज्य पातळीवरील राजकीय परिस्थिती पाहून चर्चा केली जाईल, असे या बैठकीत ठरले. या बैठकीत इंडिया या आघाडीच्या अधिकृत लोगेचो अनावरण होणार होते. मात्र काही करणास्तव हा लोगो सार्वजनिक करण्यात आला नाही.

समन्वय आणि निवडणूक रणनीती समितीची स्थापना

या बेठकीत आगामी लोकसभा निवडणूक शक्य तितक्या लवकर एकत्र लढवण्याचे ठरवण्यात आले. तसेच प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या वेगळी आहे. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावर राज्य पातळीवरच चर्चा केली जाईल, असे या बैठकीत ठरवण्यात आले. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी एकूण १४ सदस्य असलेल्या समन्वय आणि निवडणूक रणनीती समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यपातळीवरील पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करून जागावाटपावर निर्णय घेतला जाणार आहे.

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Uttar Pradesh Sambhal Excavation
Uttar Pradesh Sambhal Excavation : उत्तर प्रदेशातील संभलमध्‍ये उत्खननावेळी आढळली १५० वर्षे जुनी पायऱ्या असलेली विहीर
narendra modi
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन
BJP wins in Maharashtra Haryana due to Narendra Modi influence
मोदींच्या प्रभावामुळे महाराष्ट्र, हरियाणात भाजपचा विजय; ‘दी मॅट्रीझ’ संस्थेच्या सर्वेक्षणात माहिती
Suvendu Adhikari Contai Cooperative Bank polls
Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेसकडून घरच्या मैदानावर धुव्वा, सुवेंदु अधिकारी यांच्या अडचणी वाढणार?
Success Story Of Shantanu Dwivedi
CLAT 2025 मध्ये उत्तर प्रदेशातून अव्वल आला शंतनू द्विवेदी; कशी केली परीक्षेची तयारी? जाणून घ्या
will Ravindra Chavan to be state president soon
भाजपचे धक्कातंत्र : रवींद्र चव्हाण लवकरच प्रदेशाध्यक्षपदी?

एक जागा एक उमेदवार धोरण राबवण्याचा प्रयत्न

विरोधकांच्या मुंबईतील बैठकीत एकूण तीन ठराव मंजूर करण्यात आले. राज्यपातळीवर जागावाटपावर शक्य तितक्या लवकर चर्चा करण्याबरोबरच भाजपाचा सामना करण्यासाठी शक्य तितक्या सर्व जागांवर एका जागेवर सर्वसंमत एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

देशभरात रॅलींचे आयोजन केले जाणार

या बैठकीत आगामी काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात आघाडीकडून रॅलींचे आयोजन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागात रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलींच्या माध्यमातून विरोधकांच्या आघाडीचे सामर्थ्य दाखवण्यात येईल. निवडणूक रणनीती समिती आगामी एक किंवा दोन आठवड्यात रॅलीसाठींचे स्थळ ठरवणार आहे. यासह या बैठकीत इंडियाच्या ‘जुडेगा भारत जितेगा इंडिया’ या ब्रिदवाक्याच्या मदतीने वेगवेगळ्या भाषांत मोहीम राबवण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

समन्वय आणि निवडणूक समितीत कोणाकोणाचा समावेश?

१४ जणांच्या समन्वय आणि निवडणूक समितीत काँग्रेसचे केसी वेनुगोपाल, राष्ट्रवादीचे शरद पवार, डीएमकेचे टीआर बाळू, जेएमएम पक्षाचे हेमंत सोरने, शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय राऊत, राजद पक्षाचे तेजस्वी यादव, टीएमसी पक्षाचे अभिषेक बॅनर्जी, आप पक्षाचे राघव चड्ढा, सपाचे जावेद अली खान, जदयूचे लल्लन सिंह, सीपीआयचे डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्लाह, पीडीपी पक्षाच्या मेहबुबा मुफ्ती या नेत्यांचा समावेश असेल. सीपीआय (एम) पक्ष आपल्या प्रतिनिधीच्या नावाची घोषणा काही दिवसांनंतर करणार आहे.

बैठकीत लोगोचे अनावरण नाही

एका मुख्य समितीसह इंडिया आघाडीत एकूण चार समित्या असतील. निवडणूक प्रचार समिती, समाजमाध्यमं, माध्यमं आणि संशोधनासाठी वर्किंग ग्रुप अशी काही समित्यांची नावे आहेत. या समित्यांमध्ये आघाडीच्या सर्व पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. मुंबईच्या बैठकीत आघाडीने आपल्या लोगोचे अनावरण केले नाही. तृणमूल काँग्रेसने लोगोसंदर्भात दिलेली सूचना बहुतांश पक्षांना आवडली नाही. त्यामुळे शेवटी या लोगोचे अनावरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह या बैठकीत आघाडीचे संयोजक आणि समन्वयकाचे नाव जाहीर केले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र बैठकीत समन्वयक आणि संजयोजक अशी दोन्ही नावे जाहीर करण्यात आली नाहीत.

…तर भाजपाला जिंकणे अशक्य- राहुल गांधी

ही बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. “आम्ही तयार केलेल्या इंडिया आघाडीत देशातील जवळपास ६० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व आहे. आम्ही प्रभावी पद्धतीने एकत्र आल्यास भाजपाला जिंकणे अशक्य आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. या बैठकीत समित्यांची स्थापना तसेच जागावाटपावर चर्चेला वेग देण्याचा तसेच जागावाटपाचा मुद्दा मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही लवचिकतेचे धोरण स्वीकारले आहे- राहुल गांधी

“सध्या विरोधकांमध्ये तयार झालेल्या नात्याला फार महत्त्व आहे. या बैककीतून आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे समोर आले आहे. आमच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतभेद आहेत. असे असले तरी आम्ही लवचिकतेचे धोरण स्वीकारले आहे. आमची भूमिका लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही देशभरात फिरणार आहोत. आगामी काळात मोदी सरकार जाणार हे या बैठकीतून निश्चित झाले आहे. आम्ही सर्वजन एकत्र लढणार आहोत. भविष्यात मुदतपूर्व निवडणुका आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला सतर्क राहावे लागणार आहे,” असेही राहुल गांधी म्हणाले.

आमची १४० कोटी लोकांची आघाडी आहे- अरविंद केजरीवाल

या बैठकीनंतर आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीदेखील आपली भूमिका स्षप्ट केली. “आमच्या इंडिया या आघाडीत २८ पक्ष नाहीत. तर ज्या लोकांना २१ व्या शतकातील भारत घडवायचा आहे, त्या १४० कोटी लोकांची ही आघाडी आहे. आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत. पदासाठी कोणीही धडपडत नाहीये. आम्ही जागावाटप, माध्यमं, समाजमाध्यमं, निवडणूक रणनीती अशा प्रकारे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत,” असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

ईव्हीएमवरील सादरीकरण ऐनवेळी रद्द

दरम्यान, या बैठकीत ईव्हीएमबाबत एक सादरीकरण करण्यात येणार होते. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र काँग्रेसने कर्नाटकमध्ये नुकताच विजय संपादन केलेला आहे. यासह आघाडीची सुरुवात नकारात्मक भूमिक घेऊन करू नये, असेही आघाडीच्या काही नेत्यांचे मत होते. त्यामुळे ऐनवेळी ईव्हीएमवरील सादरीकरण रद्द करण्यात आले.

Story img Loader