मुंबई : दहिसर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरूणकर यांनी मतमोजणी आणि ‘ईव्हीएम’ यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु मुंबई महापालिकेने त्यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. महापालिकेने ‘एक्स’वरून मंगळवारी स्पष्टीकरण देत संबंधित ईव्हीएम यंत्रात त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच, ‘फॉर्म १७ सी’मधील मतमोजणीत तफावत नसल्याचेही स्पष्ट केले.

दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यामान आमदार मनीषा चौधरी, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी आमदार विनोद घोसाळकर आणि मनसेचे राजेश येरूणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. येरूणकर यांना निवडणुकीत एकूण पाच हजार ४५६ मते मिळाली. मात्र, ज्या परिसरात ते राहतात तेथील मतदान केंद्रावर त्यांना एक हजार मतदारांपैकी केवळ दोनच मते मिळाली. या मतदारसंघातून मनीषा चौधरी या तिसऱ्यांदा निवडून आल्या असून, त्यांना ५८ हजार ५८७ मते मिळाली. तर, दुसऱ्या क्रमांकावरील घोसाळकर यांना ५४ हजार २५८ मते मिळाली. मात्र, स्वत:च्या मतदार यादीतील मतदान केंद्रावर केवळ दोन मते मिळाल्यामुळे येरुणकर यांनी यंत्रणेवर आक्षेप घेऊन विविध आरोप केले.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Supreme Court on bulldozer action
SC on Bulldozer Action: ‘बुलडोझर कारवाई’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; प्रक्रियेवरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह!
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप

हेही वाचा >>>विरोधक मुक्त मतदारसंघाला मुख्यमत्र्यांचे प्राधान्य

आरोपांबाबतची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरू लागली होती. येरुणकर यांच्या आरोपामुळे मतमोजणी प्रक्रिया व ईव्हीएम यंत्रणेबाबतच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याचे लक्षात येताच महापालिका प्रशासनाने मंगळवारी ‘एक्स’वरून सर्व आरोपांचे खंडन केले.

बॅटरीबाबतही स्पष्टीकरण

कंट्रोल युनिटमध्ये २ हजार वॅट्स क्षमतेची उत्तम दर्जाची बॅटरी वापरण्यात आली आहे. एखाद्या मतदान केंद्रावर १ हजारांहून कमी मतदान झाले, तर यंत्राचा साहजिकच कमी वापर होतो. त्यामुळे वापरानंतरही यंत्राची बॅटरी ९९ टक्के दिसते, असेही महापालिकेने नमूद करत येरुणकरांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.