वसंत मुंडे

बीड: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापासून पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे या दूर राहिल्या. त्याचवेळी शिवसेनेतून हकालपट्टी केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची फडणवीस यांच्याशी जवळीकता वाढल्याने क्षीरसागरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर क्षीरसागरांच्या माध्यमातून आता जिल्हास्तरावरही पक्षांतर्गत सक्षम सहकारी (पर्याय) उभा करण्याची रणनीती आखली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंडे भगिनी समर्थकातील अस्वस्थता वाढल्याचे चित्र समाजमाध्यमातील प्रतिक्रियांमधून उमटू लागले आहे.

loksatta readers feedback
लोकमानस: विकासापेक्षा भावनांचे राजकारण सोपे
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
modi with army
इंचभर भूमीचीही तडजोड नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावले; कच्छमध्ये जवानांबरोबर दिवाळी
BRICS summit
‘ब्रिक्स’ची २०२६ पर्यंत जागतिक व्यापारात जी७ देशांना मात

बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन्ही दौऱ्यापासून भाजपच्या सचिव पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे दूर राहिल्याने भाजप अंतर्गत फडणवीस आणि पंकजा यांच्यातील संघर्षाचे वेगवेगळे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. गहिनीनाथगडाच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थिती लावून कौतुक करत जवळीकता वाढवली. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना बीड नगरपालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केल्यामुळे शिवसेना संपर्कप्रमुखांनी पत्रकार बैठक घेऊन जयदत्त क्षीरसागरांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती. तेंव्हापासून क्षीरसागरांनी पुन्हा एकदा भाजप प्रवेशासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचा दावा समर्थकांचा आहे.

हेही वाचा >>> राजकारणासाठी काहीही!, भाजपच्या युवा मार्चा प्रदेश उपाध्यक्षाने स्वत:च्या जागेवर नियुक्त केला खासगी शिक्षक

 राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून क्षीरसागर घराणे शरद पवारांबरोबर होते. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभर संपर्क आणि हक्काची यंत्रणा असल्याने त्यांचा विधानसभेच्या सर्व मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात प्रभाव आहे. अखिल भारतीय तैलिक शाहू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे जयदत्त क्षीरसागर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्याशीही जवळीकता आहे. तीन वर्षापूर्वी गृहकलहानंतर राष्ट्रवादीतून बाहेर पडताना क्षीरसागरांची भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याने त्यांनी लोकसभेला भाजपला समर्थन दिले होते. तत्कालीन भाजप-सेना युतीत एकमेव बीड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याने भाजप नेतृत्वाच्या संमतीनेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन तीन महिन्यासाठी मंत्री पदही मिळवले होते असा दावा केला जातो. पण विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान परळी मतदारसंघातूनही पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर राज्य पातळीवर पक्षांतर्गत नेतृत्व संघर्षात पक्षाने मुंडेंच्या प्रभाव क्षेत्रात नव्यांना संधी देण्याचे धोरण राबवले.

हेही वाचा >>> ‘सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उर्फीच्या कपड्यांची जास्त काळजी’ रविकांत तुपकर यांचा आरोप, म्हणाले “सरकारच्या बुडाखाली…”

लातुरमधून भाजपचे रमेश कराड तर जामखेड मधून राम शिंदे (नगर) यांना विधान परिषद तर औरंगाबाद मधून डॉ.भागवत कराड यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाची संधी देऊन पक्ष नेतृत्वाने आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मुंडे भगिनींना टाळून नेतृत्व दुसर्या फळीतील इतरांना संधी देत असल्यामुळे मुंडे समर्थकांनी पदाचे राजीनामे देऊन आणि समाज माध्यमातून तीव्रपणे व्यक्त होत आपली नाराजी जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर यांची फडणवीस यांच्याशी जवळीकता वाढली असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचेही दावे केले जात आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाकडून आता थेट जिल्ह्यातच क्षीरसागरांच्या माध्यमातून पक्षासाठी सक्षम पर्याय उभा करण्याची रणनिती आखली जात आहे.