पत्नीच्या खुनाचा आरोप असलेले माजी आमदार अमनमणी त्रिपाठी यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमनमणी यांच्या पक्षप्रवेशाने पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला; तर भाजपाने काँग्रेसवर गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि ब्राम्हण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न म्हणून अमनमणी यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिले जात आहे.

कोण आहेत अमनमणी त्रिपाठी?

२०१५ मधील सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, अमनमणी यांनी आपली पहिली पत्नी सारा सिंहचा गळा दाबून खून केला होता. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. माजी आमदार अमनमणी हे उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी (६६) आणि मधुमणी त्रिपाठी (६१) यांचे चिरंजीव आहेत. या जोडप्याला कवयित्री मधुमिता शुक्ला यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. २००७ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांची सुटका केली होती. आई-वडिलांच्या सुटकेनंतर आता अमनमणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
husband dies by suicide
‘तिला धडा शिकवा’, अतुल सुभाष प्रकरणाप्रमाणे व्हिडीओ बनवून पतीची आत्महत्या; पत्नीवर केले गंभीर आरोप
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…
Image Of Prakash Ambedkar And Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस तुमचे पोलीस खाते भ्रष्ट झाले आहे”, संतोष देशमुख हत्येच्या तपासावर प्रकाश आंबेडकरांची टीका

भाजपामध्ये प्रवेश करण्याची होती तयारी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमनमणी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता आणि त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधाचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी कुटुंब म्हणून केला होता. त्यामुळे अमनमणी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, माजी आमदार अमनमणी यांनी पक्षाशी संपर्क साधला होता, परंतु केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यामुळे त्यांना पक्षात समाविष्ट करता आले नाही. “त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु पक्ष त्यांना महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास इच्छुक नव्हता. यामुळेच ते काँग्रेससह इंडिया आघाडीत गेले,” असे भाजपाच्या नेत्याने सांगितले.

माजी आमदार अमनमणी म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माझ्या आईवडिलांप्रमाणे आहेत. परंतु, आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत. आमचे वैयक्तिक संबंध आहेत. पण ते राजकारणापेक्षा वेगळे आहेत. काँग्रेसच्या विचारधारेमुळे मी काँग्रेसमध्ये सामील झालो, असे अमनमणी यांनी सांगितले. अमनमणी यांनी २०१७ ची विधानसभा निवडणूक त्यांचे मूळ गाव नौतनवा येथून जिंकली होती. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या समाजवादी पक्षाचे उमेदवार कुँवर कौशल सिंह यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढत, त्यावेळी पक्षाने ४०३ पैकी ३१२ जागा जिंकल्या होत्या.

भाजपाचा काँग्रेसवर निशाणा

अमनमणी यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “काँग्रेस पुन्हा एकदा गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. काँग्रेसने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्याला का समाविष्ट केले? या नेत्यावर पत्नीच्या खुनाचा आरोप आहे,” असे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले. अमनमणी यांनी भाजपाच्या आरोपांना फेटाळले आणि जर मी गुन्हेगार असेन तर ब्रिजभूषण शरण सिंह (लैंगिक छळाचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजपा खासदार) कोण होते? असा प्रश्न त्यांनी केला. “त्यांची चौकशी का झाली नाही? भाजपाच्या अनेक खासदार आणि आमदारांची चौकशी सुरू आहे. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी निर्दोष आहे,” असे ते म्हणाले.

काँग्रेस नेत्यांसाठीही आश्चर्याचा धक्का

अनेक काँग्रेस नेत्यांनी अमनमणी यांच्या पक्षप्रवेशावर आश्चर्य व्यक्त केले. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, राज्य युनिटच्या नेत्यांनादेखील याची माहिती नव्हती. “दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. आम्हालाही आश्चर्य वाटले,” असे ते म्हणाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे यांनी असा दावा केला की, अमनमणी यांना पक्षाची मदत करायची होती, म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केला. भाजपाचे याबाबत काय म्हणणे आहे, यावर मी भाष्य करणार नाही,” असे त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत फरेंदाचे आमदार वीरेंद्र चौधरी आघाडीवर असल्याने अमनमणी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता नसल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. “चौधरी यांना (महाराजगंज जागेसाठी) उमेदवारी द्यावी, परंतु अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,” असे नेते म्हणाले. महाराजगंजची जागा आपणच जिंकू शकतो, असे काँग्रेसला सांगितले असल्याचे अमनमणी म्हणाले. “त्यांनी कोणतेही वचन दिलेले नाही. माझ्या उमेदवारीबाबत ते विचार करतील,” असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: वाराणसी: मोदींच्या मतदारसंघातच ‘या’ काँग्रेस खासदाराचा भाजपात प्रवेश

महाराजगंज जागेसाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचेदेखील नाव चर्चेत होते. त्यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती; ज्यात त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र, यंदा त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीनेत यांचे वडील हर्षवर्धन यांनी २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराजगंज मतदारसंघातून विजय मिळवला होता.

Story img Loader