इम्रान मसूद पहिल्यांदाच लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. अनेक वर्षांपासून ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मसूद सहारनपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या राघव लखनपाल यांचा ६४,५४२ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत बसपाचे माजिद अली तिसऱ्या स्थानावर होते. सहारनपूर भागात अनेक दशकांपासून प्रभावशाली असलेल्या आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा मसूद पुढे नेत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ते ओळखले जातात.

मतदारसंघात ‘कावड कॅम्प’चे उद्घाटन

गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपल्या मुस्लीम कट्टरपंथी प्रतिमेवर काम केले आणि जातीय मुद्द्यांवर भाष्य करणे टाळले आहे. त्याऐवजी, त्यांनी हिंदू मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून ते अनेकदा “राम मिलेंगे मर्यादा से जीने में, राम मिलेंगे हनुमान के सिने में” असे म्हणताना दिसले आहेत. गेल्या आठवड्यात मसूद यांनी त्यांच्या मतदारसंघात कावड यात्रींसाठी ‘कावड कॅम्प’चे उद्घाटन केले; जिथे त्यांनी यात्रेकरूंना अन्न आणि फळे दिली.

zeeshan siddique sana malik joined ajit pawar ncp candidate list for maharashtra vidhan sabha election 2024 print politics news
Zeeshan Siddique Sana Malik Joined NCP: भाजपचे माजी दोन खासदार नवाब मलिक, बाबा सिद्दिकी यांच्या मुलांना राष्ट्रवादीची उमेदवारी
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Nationalist Ajit Pawar Group MLA Yashwant Mane
यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण? मोहोळमध्ये आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी
bhandara MLA Narendra Bhondekar said i received Mahavikas Aghadi proposal but did not accept it
मला महाविकास आघाडीकडून… शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट…
Eknath Shinde at Kamakhya temple
CM Eknath Shinde:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा देवीच्या दरबारात; काय सांगतो कामाख्या मंदिराचा इतिहास?
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
sakshi malik on brij bhushan singh
Sakshi Malik: ‘भाजपा नेत्या बबिता फोगट यांनीच रचलं कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं षडयंत्र’, साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Muslim or Halba candidate Embarrassment for Congress in nagpur
काँग्रेससमोर पेच; मुस्लीम की हलबा उमेदवार?

हेही वाचा : अरविंद केजरीवलांनंतर ‘आप’च्या आणखी एका नेत्याला होणार अटक? कोण आहेत दुर्गेश पाठक?

इम्रान मसूद यांची राजकीय पार्श्वभूमी

मसूद यांचे आजोबा काझी कयूम अहमद यांची १९२३ मध्ये गंगोह क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचे आजोबा १९६९ मध्ये नाकुर येथून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी ते २७ वर्षे गंगोह नगर परिषदेचे अध्यक्ष राहिले. इम्रान यांचे वडील रशीद मसूद हेही गंगोह नगरपालिकेचे अध्यक्ष होते. परंतु, ते त्यांचे काका राशीद मसूद यांच्या कार्याने प्रेरित असल्याचे सांगतात. त्यांचे काका राशीद मसूद १९७७ मध्ये सहारनपूरमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते आणि २००४ मध्ये समाजवादी पार्टीचे (सपा) उमेदवार म्हणून या जागेवरून पाचव्यांदा निवडून आले होते.

इम्रान मसूद यांनी २००१ मध्ये सहारनपूर नगर परिषदेसाठी निवडणूक लढवून मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रवेश केला. २००६ पर्यंत ते नगर परिषदेचे अध्यक्ष झाले. २००७ मध्ये, ते प्रथमच मुझफ्फराबाद विधानसभेच्या जागेवरून (२००८ मध्ये झालेल्या सिमांतरानंतर बेहट म्हणून ओळखले जाणारे) अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मसूद त्यांच्या काकांच्या मार्गदर्शनाने पुढे गेले. २०१२ मध्ये काँग्रेसने राहुल गांधींच्या टीममध्ये त्यांची युवा चेहरा म्हणून निवड केली. त्याच वर्षी, त्यांनी नाकुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु बसपाच्या धरमसिंह सैनी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

मसूद यांच्याकडून पंतप्रधान मोदींना धमकी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची एक व्हिडिओ क्लिप समोर आली होती; ज्यामध्ये मसूद २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलीसाठी भाजपा आणि संघाला जबाबदार धरताना आणि भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना कथितपणे धमकी देताना दिसले होते. त्यांच्यावर द्वेष पसरवणार्‍या भाषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपाच्या राघव लखन पाल यांच्याकडून पराभव झाला. २०१७ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही मसूद यांना पराभव स्वीकारावा लागला.

काँग्रेस नंतर सपा आणि नंतर बसपा

२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी, मसूद यांनी सपामध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसची साथ सोडली. पण त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये, त्यांनी बसपामध्ये सामील होण्यासाठी सपाची साथही सोडली. बसपामध्ये त्यांना उत्तराखंडमधील मुस्लिमांमध्ये काम करण्याची अतिरिक्त जबाबदारी दिली आणि पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पश्चिम उत्तर प्रदेशसाठी त्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. परंतु, ऑगस्ट २०२३ मध्ये, मायावती यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली मसूद यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले. बसपातील सूत्रांनी सांगितले की, माध्यमांसमोर केलेल्या काही वक्तव्यांमुळे पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व त्यांच्यावर नाराज होते. माध्यमांसमोर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे कौतुक केले होते.

इम्रान मसूद यांची प्रतिक्रिया

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मसूद म्हणाले, “मी एका राजकीय कुटुंबात वाढलो आहे. १९८७ मध्ये मी लखनऊ विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश घेतला, तेव्हा मी विद्यार्थी संघटनेच्या राजकारणापासून सुरुवात केली. मी माझा कौटुंबिक वारसा पुढे नेत आहे.” लोकसभेच्या पहिल्या सत्राचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “मला संसदेत समर्थन मिळाले. सर्व पक्षांतील ज्येष्ठ सदस्यांनी नवीन सदस्यांना पाठिंबा दिला. जेव्हा मी अध्यक्षीय भाषणावर माझे सभागृहाचे भाषण संपवले तेव्हा दोन मंत्र्यांसह अनेक भाजपा खासदारांनी माझे कौतुक केले.” संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्याकडे अनेक प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले. “आतापर्यंत मला केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी मिळालेली नाही, परंतु अनुदानाच्या मागणीवरील चर्चेदरम्यान मी यावर बोलेन,” असे ते म्हणाले.

हेही वाचा : काकांचा पत्ता कापून अखिलेश यादवांनी ब्राम्हण नेत्याला दिले विरोधी पक्षनेतेपद; कोण आहेत माता प्रसाद पांडे?

“पुढील पाच वर्षांत जेव्हा जेव्हा मला सभागृहात बोलायची संधी मिळेल, तेव्हा तेव्हा मी वेळेचा सदुपयोग करेन. सहारनपूरसाठी माझी पहिली चिंता आरोग्य सेवा आहे. यावर चर्चा करण्यासाठी मी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे वेळ मागितला आहे,” असे मसूद म्हणाले. आतापर्यंत सभागृहात झालेल्या चर्चेबद्दल बोलताना ते म्हणाले, “निःसंशयपणे, राहुल गांधीजी (विरोधी पक्षनेते) यांनी संसदेत एक प्रभावशाली भाषण केले. यंदा विरोधी पक्ष मजबूत स्थितीत आहे.”