लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेनेच्या (ठाकरेे) पराभूत उमेदवारांच्या बैठका दोन्ही पक्षांकडून घेण्यात आल्या. या बैठकीत आपल्या पराभवाला मतदान यंत्रे (ईव्हीएम) कारणीभूत असल्याचे गाऱ्हाणे उमेदवारांकडून मांडण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीने आता मतदान यंत्रांविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार नजीकच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाची रणनीती तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत.

maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
Solapur, Uddhav Thackeray group leader, benami assets,
सोलापूर : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडे ११.१२ कोटींची बेनामी मालमत्ता, बार्शीत गुन्हा दाखल
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
News About Batenge to Katenge Slogan
Ashok Chavan : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?
maharashtra assembly election 2024 amit thackeray sada saravankar mahesh sawant dadar mahim assembly constituency
लक्षवेधी लढत : दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे) २०, तर राष्ट्रावादीला (शरद पवार) १० जागांवर समाधान मानावे लागले. या निकालासंदर्भात राष्ट्रवादी (शरद पवार) गटाची बैठक यशवंतराव चव्हाण केंद्र, तर शिवसेनेची (ठाकरे) बैठक ‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडली. या दोन्ही बैठकांच सूर हा मतदान यंत्रांच्या विरोधातच होता. टपाली मतदानात आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य असताना ईव्हीएममध्ये अपेक्षित मतदान झाले नसल्याबद्दल उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा >>>Maharashtra Vidhan Sabha Election Result: “महाराष्ट्र निवडणूक निकालात ४ बाबींचं आश्चर्य…”, योगेंद्र यादव यांनी केलं विश्लेषण!

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून ९५ उमेदवार मैदानात उतरले होते, त्यातील २० उमेदवार विजयी झाले. पराभूत ७५ उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान या सर्वांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. उमेदवारांची कैफियत ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्यावतीने लवकरच यासंदर्भात भूमिका घेतली जाईल. तत्पूर्वी, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून आंदोलन उभारले जाईल, असे आश्वासन दिले. जिथे जिथे मतमोजणीमध्ये गोंधळ झाला, त्या ठिकाणी ‘व्हीव्हीपॅट’ मतमोजणीसाठी आयोगाकडे अर्ज करण्याचे आदेश ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांना दिले आहेत.

शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीतही मतदान यंत्रांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी मतदारसंघातील काही उदाहरणे दिली तेव्हा यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या.

हेही वाचा >>>महायुतीच्या लाटेत विरोधकांसोबत काही सत्ताधारीही गारद, विदर्भात १२ विद्यमान आमदार पराभूत

मतपत्रिकेवर निवडणुका घ्या’

विधानसभा निवडणुकांचा निकाल हा अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. मतदान यंत्रामध्ये छेडछाड करून निकाल प्रभावित केला असून सदर निकाल रद्द करून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी ‘ईव्हीएम विरोधी जनआंदोलन मंच’ने केली आहे. तुषर गांधी, धनंजय शिंदे, रवि भिलाणे, फिरोज मिठीबोरवाला, माजी आमदार विद्या चव्हाण, ज्योती बडे आदी कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत सदर मागणी केली. मतदान यंत्रासदंर्भातील १७-अ अर्जाची माहिती कित्येक मतदारसंघात जुळत नाही. मतदानापेक्षा मतदान यंत्रात अधिक मते आढळले, असे आरोप या मंचने केले आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडीचा विजय होतो, पण विधानसभेच्या सर्व जागा तिकडे जातात. याचा अर्थ जिल्ह्याजिल्ह्यात ‘पॅटर्न’ दिला आहे. सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन मतदान यंत्रांच्या विरोधात जन आंदोलन उभे करण्याची गरज आहे. दिल्लीत जसे शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले, तशा प्रकारचे आंदोलन उभे करावे लागणार आहे. याबाबतची मानसिक तयारी आमची झाली आहे. जितेंद्र आव्हाडआमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट