राजेश्वर ठाकरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : महाविकास आघाडीची दुसरी संयुक्त सभा नागपूरमध्ये १६ एप्रिल होणार असतानाच काँग्रेस पक्षांतर्गत नेत्यांची मूठ सैल झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेपूर्वी त्यांच्या मतदारसंघात पक्षनेतृत्वाला विश्वसात न घेताच जाहीर सभा घेतली तर माजी आमदार आशिष देशमुख यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तोंडसुख घेतले.
हेही वाचा >>> सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अलिप्त, सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज?
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्याविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने विभागवार संयुक्त सभा घेतल्या जात आहेत. त्यापैकी पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या संयुक्त सभेला वज्रमूठ सभा संबोधण्यात येत आहे. दुसरी सभा नागपुरात दर्शन कॉलनी मैदानात होत आहे. सभेच्या तयारीला तीनही पक्षाचे नेते लागले आहे. माजी मंत्री सुनील केदार, विजय वड्डेट्टीवार, आ. विकास ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला. पण नेहमीच वेगळी व पक्षविरोधी भूमिका घेणारे माजी आमदार आशीष देशमुख यांनी या सभेत खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले. देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केले आहे. पहिल्या सभेला नाना पटोले उपस्थित नव्हते. त्यावर देशमुख यांनी नाना पटोले सुरत मार्गावर आहेत. ते १६ एप्रिलला म्हणजे नागपुरातील सभेच्या दिवशी ते गुवाहाटीला दिसतील, अशी टीका केली. देशमुख यांच्या आरोपाला कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिउत्तर देत देशमुख यांचे मानसिक संतुलन बिघडले अशी टीका केली.
हेही वाचा >>> रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे रिंगणात ?
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी माजी मंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या मतदार संघात जाहीर सभा घेतली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेधार्थ ही सभा होती, परंतु महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेची तयारी सुरू असताना त्यात सहकार्य न करता स्वतंत्र सभा घेऊन काय साध्य करण्याचा प्रयत्न होता. शिवाय यासाठी शहर काँग्रेसला विश्वासात देखील घेण्यात आले नाही. एकूणच काय तर काँग्रेस पक्षातील नेत्यांची एकजूट नाही. कोणालाही कोणाचे नेतृत्व मान्य नाही. पक्षशिस्त नाही आणि तरी देखील भिन्न विचाराच्या पक्षाशी आघाडी करून वज्रमूठ सभा घेण्यात आहे. पण, सभेपूर्वी तरी किमान पक्षांतर्गत धुसपूस बाजूला ठेवून वज्रमूठ नाहीतर किमान मुठ सैल दिसणार नाही. याची खबरदारी घेण्याची तसदी नागपुरातील काँग्रेस नेते घेण्यास तयार नाहीत.