यावेळच्या नागालँड विधानसभा निवडणुकीने इतिहास घडवला आहे. नागालँड राज्याची स्थापना झाल्यापासून येथे निवडणुकीत एकाही महिला उमेदवाराचा विजय झाला नव्हता. मात्र या निवडणुकीत NDPP पक्षाने सलहौतुओनुओ कुर्से आणि हेकानी जखालू या दोन महिलांना तिकीट दिले होते. या दोन्ही महिलांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. नागालँड विधानसभेच्या जखालू या पहिल्या तर कुर्से या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत.

हेही वाचा >>> भाजपाची तिन्ही राज्यांत चांगली कामगिरी, पण जनाधार मात्र घटला! नागालँड, त्रिपुरा, मेघालयच्या निकालाचा अर्थ काय?

या निवडणुकीत एकूण चार महिला उमेदवार

नागालँडच्या निवडणुकीत एकूण चार महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यातील कुर्से आणि जखालू यांना एनडीपीपी पक्षाने तर काँग्रसेने रोजी थॉम्सन आणि भाजपाने काहुली सेमा यांना उमेदवारी दिली होती. मात्र थॉम्सन आणि सेमा यांचा पराभव झाला. तर कुर्से आणि जखालू यांनी बाजी मारली. कुर्से राजकाणात येण्याआधी समाजकार्यात सक्रिय होत्या. कुर्से यांनी वेस्टर्न अंगामी या मतदारसंघातून एनडीपीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांनी अपक्ष उमेदवार केनेझाको नाख्रो यांना अवघ्या सात मतांच्या फरकांनी पराभूत केले.

झिमोमी यांचा दीड हजार मतांनी विजय

तर वकिलीचे शिक्षण घेतलेल्या जखालू यांनी दिमापूर-३ या मतदारसंघातून एनडीपीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. जखालू यांनी या मतदारसंघात एलजेपी (राम विलास) पक्षाच्या अझेतो झिमोमी यांच्यावर १५०० मतांनी विजय मिळवला.

हेही वाचा >>> मेघालय : भाजपाला सोबत घेत एनपीपीकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली, तृणमूलचाही बहुमत असल्याचा दावा; कोणाची सत्ता येणार?

दरम्यान, नागालँड राज्याची स्थापना झाल्यापासून विधिमंडळात एकही महिला सदस्य नव्हती. येथे एकाही महिलेचा निवडणुकीत विजय झालेला नव्हता. मात्र या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन महिला उमेदवारांचा विजय झाल्यामुळे विधिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व मिळाले, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Story img Loader