Nagpur Assembly Election 2024 : मध्य नागपुरात काँग्रेसने मुस्लिम समाजाला उमेदवारी न दिल्याने पक्षावर संताप व्यक्त करीत वंचित बहुजन आघाडीमध्येमध्ये सोमवारी प्रवेश घेणारे व याच पक्षाकडून मध्य नागपूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे काँग्रेस नेते व माजी मंत्री अनिस अहमद आज वेळेत अर्ज दाखल करू न शकल्याने विधानसभा निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेसतर्फे सलग तीन वेळा आमदार आणि अनेक वर्षे मंत्रीपद भूषवलेले अनीस अहमद अनेक वर्षापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र मागच्या काही वर्षात त्यांची भाजपसोबत सलगी वाढली होती. कधी शैक्षणिक संस्थांच्या कामासाठी तर कधी व्यवसायिक कामांसाठी ते सत्ताधाऱ्यांची मदत घेत होते. लोकसभा निवडणुकीतही ते काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय नव्हते. पण विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर त्यांनी काँग्रेसने मध्य नागपुरातून अल्पसंख्यांकांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. अल्पसंख्यांकाना उमेदवारी न दिल्यास हा समाज काँग्रेसपासून दूर जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. पण त्यांनी विधानसभेसाठी पक्षाकडे अर्ज केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते.

Dadarao Keche, Lakhan Malik, BJP denied tickets,
भाजपने भाकरी फिरवली, ‘या’ विद्यमान आमदारांना घरीच बसवले
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra Chief Minister Eknath Shinde filed nomination from Kopri-Pachpakhadi constituency, in Thane on Monday.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी महायुतीत राहून स्वतःचं महत्त्व कसं अबाधित ठेवलं?
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
split in Naik family in Pusad, Naik family, Pusad,
पुसदमध्ये नाईक घराण्यात उभी फूट, सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?

काँग्रेसने मध्य नागपुरातून बंटी शेळके यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांनी एकदम काँग्रेसवर टीका करणे सुरू केले. काँग्रेस मुस्लिमांवर अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले. अपेक्षेप्रमाणे सोमवारी त्यांचा मुंबईत वंचत्मध्ये प्रवेश झाला. ते मध्य नागपूरमधून वंचितचे उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले. ते मंगळवारी अर्ज भरणार होते. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासमवेत जिल्हाधिकारी जाणार होते. अर्ज भरण्याची वेळ संपत आली तरी अनिस अहमत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेच नाही, त्यामुळे सर्वांचे लक्ष ते येणार किंवा नाही याकडे लागले होते. अशात ते आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

३ वाजून २ मिनिटानी जिल्हाधीकारी कार्यालयात दाखल झाले आणि अर्ज भरण्याची वेळ ही ३ वाजताच संपलेली होती. त्यांनी आतमध्ये प्रवेश केला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. त्यांमुळे जागावाजा करीत वंचितमध्ये प्रवेशकर्ते झालेले अनिस अहमद पक्षाची उमेदवारी मिळूनही निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा… Bhandara Gondia Assembly Constituency : आमदार फुकेंच्या एकाधिकारशाहीमुळे भाजपमध्ये खदखद ?

याबाबत वंचित आघाडीचे शहर प्रमुख रवी शेंडे यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितले, अनिस अहमद यांनी वंचित बहुजन समाज आघाडीत प्रवेश केल्यामुळे आमची ताकद वाढली होती. मध्य नागपुरात आम्हाला चांगला उंमेदवार त्यांच्या रुपाने मिळाला होता. अर्ज भरण्याच्यावेळी पक्षाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले होते मात्र अनिस अहमद यांना पोहचण्यास उशिर झाल्यामुळे ते त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.

अनिस वंचितमध्ये गेल्यामुळे व ते निवडणूक लढणार असल्यामुळे उमेदवारीमुळे मध्य नागपूरमध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनाची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याची चर्चा होती. मध्य नागपूर हा मुस्लिम व हलबाबहुल मतदारसंघ आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपने हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना उमेदवारी दिली. यंदाही ते स्पर्धेत होते. पण, यावेळी भाजपने गैरहलबा प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली.