नागपूर: अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर मतदारसंघातून माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपने पुन्हा एकदा डॉ. मिलींद माने यांच्यावर विश्वास दाखवला आहे. डॉ. माने यांनी २०१४ मध्ये नितीन राऊत यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये डॉ. राऊत यांनी डॉ. मानेंना पराभूत करून वचपा काढला आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा या दोघांमध्ये लढत रंगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांनी १९९९ पासून चार वेळा उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण, २०१४ मध्ये त्यांचा भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी पराभव केला होता. त्यावेळी बसपमधून किशोर गजभिये यांनी ५५ हजार मते घेतली होती. अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन होऊन यावेळी काँग्रेसला फटका बसल्याने भाजपच्या डॉ. मानेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्यावेळी बसपने काँग्रेसपेक्षा जास्त मते घेतली होती. काँग्रेसला २७.५४ टक्के आणि बसपाला ३०.३७ टक्के मिळाली होती, तर भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी ३७.९३ टक्के मते घेत विजय संपादन केला होता. यावरून अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन झाले तरच भाजपसाठी संधी निर्माण होऊ शकते, हे स्पष्ट आहे. हे समीकरण बघता डॉ. मानेंच्या विजयासाठी भाजपधुरीण काय डावपेच आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दुसरीकडे, बसपचे बुद्धम राऊत आणि अपक्षांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.

हेही वाचा >>>Raver Vidhan Sabha Constituency: रावेरमध्ये शिरीष चौधरी, हरिभाऊ

भाजपचे ५० हजार दलित मतविभाजनाचे लक्ष?

२०१९ मध्ये डॉ. मिलींद माने यांनी ६६ हजार १२७ तर डॉ. नितीन राऊत यांना ८६ हजार मते मिळाली होती. यावेळीही बसपचे सुरेश साखरे यांनी २३ हजार तर वंचितचे विनय भांगे यांनी ५ हजार ५९९ मते घेतली होती. यावेळीही दलित मतांचे विभाजन झाले होते. असे असतानाही राऊत यांनी २० हजार मतांनी विजय मिळवला होता. पुन्हा एकदा उत्तर नागपूरचा सामना माने आणि राऊत यांच्यात रंगणार असल्याने भाजपला विजयासाठी किमान ५० हजार दलित मतांच्या विभाजनाची गरज पडणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur north assembly constituency congress nitin raut vs bjp milind mane in north nagpur vidhan sabha election 2024 print politics news amy