नागपूर : शिवसेनेचे (ठाकरे गट) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शनिवारी राज्यात आगामी महापालिका निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार, अशी घोषणा केली. मात्र, ज्या नागपूरमध्ये त्यांनी ही घोषणा केली तेथे त्यांच्या पक्षाचे बळ किती, ? १५१ सदस्यीय महापालिकेत या पक्षाचे केवळ दोन सदस्य होते. त्याजोरावर हा पक्ष स्वबळावर लढू शकणार आहे का ? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पक्षाने स्वबळाचा निर्णय घेतला असे राऊत म्हणाले असले तरी नागपुरातील निष्ठावंत शिवसैनिकांना मुंबईतील नेतृत्वाकडून सातत्याने डावलण्याची परंपरा अद्यापही कायम आहे. त्यामुळेच पक्षाची नागपुरात घसरण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आघाडीविषयी वाढलेल्या अपेक्षा विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे फोल ठरल्या व आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली. आघाडी कायम राहणार की फुटणार? अशी चर्चा सुरू झाली. राऊत यांनी नागपुरात केलेली स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याची घोषणा यामुळे आघाडीची वाटचाल फुटीकडे सुरू असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेसाठी मुंबई महापालिका महत्त्वाची असल्याने त्या अनुषंगाने राऊत यांची घोषणा महत्त्वाची असली तरी ज्या नागपूरमध्ये त्यांनी ही घोषणा केली तेथे त्यांच्या पक्ष स्वबळावर लढण्याइतका सक्षम आहे का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : अजित पवार स्वबळावर लढणार का ?

शिवसेनेची नागपुरातील स्थिती

२००७ मध्ये एकीकृत शिवसेनेचे ९ नगरसेवक होते. २०१२ मध्ये ही संख्या ६ वर आली, २०१७ मध्ये फक्त दोनच नगरसेवक निवडून आले. तेही एकाच प्रभागातून. त्यापैकी एक शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया हे आहे. १५१ सदस्यीय महापालिकेत ठाकरे गटाचे फक्त दोन नगरसेवक होते. यावरून या पक्षाची शहरातील राजकीय ताकद लक्षात येते. शहरात पक्षाचा एकही आमदार नाही, विधान परिषद सदस्यही नाही. त्यामुळे शिवसेने (ठाकरे) स्वबळार लढण्याचा निर्णय घेतला तरी त्यांच्याकडे सर्व महापालिकेच्या ५२ प्रभागात लढण्यासाठी उमेदवार तरी आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

निष्ठावंतांवर सातत्याने अन्याय?

शिवसेनेचा नागपूरमधून आतापर्यंत एकही आमदार निवडून आला नसला किंवा महापालिकेतही पक्षाच्या उल्लेखनीय कामगिरीचा इतिहास नसला तरी हा पक्ष नागपूरच्या राजकारणात दखलपात्र होता. विशेषत: पूर्व नागपूर, मध्य, दक्षिण नागपूरमध्ये पक्षाची विशिष्ट मतपेटी होती. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुरुवातीच्या काळात शेकडो तरुण कार्यकर्ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले होते. पण मुंबईतून नेतृत्व लादण्याच्या पक्षाच्या नीतीमुळे अनेक कट्टर शिवसैनिक पक्षापासून दूर गले. बाहेरून आलेल्यांना सन्मान, पदे आणि निष्ठावंतांचा फक्त वापर यामुळे त्यांच्याकडे आंदोलन करणे, सदस्य नोंदणी करणे एवढीच कामे शिल्लक उरली. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याने कार्यकर्त्यात निराशा आली. त्यामुळे संघटनात्मकदृष्ट्या पक्षाची वाढ खुंटली. पक्षाचे नेते संजय राऊत नागपुरात येणार याची माहितीच सेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना नव्हती, यावरून पक्षातील संवाद प्रक्रिया संपल्याचे सेनेच्या नेत्यांनी बोलून दाखवले.

हेही वाचा : इंडिया आघाडी विसर्जित होणार? केजरीवालांना पाठिंबा देण्यावरून दोन गट; अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितले….

संजय राऊत पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विचाराअंतीच स्वबळाचा नारा दिला असेल. मात्र, याबाबत आमच्याशी चर्चा झाली नाही, ते येणार याची कल्पनाही आम्हाला नव्हती.

किशोर कुमेरिया, जिल्हा प्रमुख, नागपूर

Story img Loader