Shivsena Thackeray and NCP Sharad Pawar Group in Maha Vikas Aghadi नागपूर: जागा वाटपाच्यावेळी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वापुढे न झुकता मेरिटच्या आधारावर कॉंग्रेसला अधिक जागा मिळाव्यात म्हणून आग्रही आणि आक्रमक भूमिका घेणारे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ( ठाकरे) आणि राष्ट्रवादी ( श.पा.) या घटक पक्षांना लगाम घालण्यात यश आले आहे.

राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी (श.पा.) आणि शिवसेना (ठाकरे) यांची आघाडी आहे. यात सर्वात जुना आणि मोठा पक्ष कॉंग्रेस आहे. उर्वरित दोन पक्षात फूट पडली असली तरी जनमानस त्यांच्यासोबतच असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आली आहे.मात्र या दोन्ही पक्षापेक्षा कॉंग्रेसचे यश अधिक आहे. त्यामुळे हाच पक्ष आघाडीत मोठा भाऊ ठरतो. नेमकी हीच भूमिका पटोले यांनी जागा वाटपात घेतली आहे. वास्तविक  जिथे आघाडी असते तेथे मोठ्या पक्षावर घटक पक्षांचा जागावाटप चर्चेच्यावेळी दबाव असतोच, अशा परिस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेली ठाम भूमिका सध्या चर्चेत आहे.कॉंग्रेससाठी संघर्ष करणारा नेता, अशी प्रतिमा तयार झाली आहे.

हेही वाचा >>>Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”

पटोलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने  लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते कायम ठेवण्याचे आव्हान कॉंग्रेस पुढे आहे. ही बाब ओळखूनच पटोले यांनी पक्ष जिंकून येऊ शकेल अशा सर्व प्रमुख मतदारसंघांवर दावा सांगून काँग्रेसला मजबूत पर्याय म्हणून उभं केलं आहे.

काँग्रेस, शिवसेना (उबठा), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात चालू असलेल्या जागावाटप चर्चांमध्ये प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेकांनी काँग्रेसने मित्रपक्षांसाठी काही जागांचा त्याग करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती, पण नाना पटोलेंनी ठाम भूमिका घेतली. विशेषतः विदर्भासारख्या पारंपरिक प्रभाव असलेल्या भागात काँग्रेसला महत्त्वपूर्ण जागा मिळाव्यात, यासाठी त्यांनी वेळेप्रसंगी शिवसेनेचा दबाव झुगारला.

हेही वाचा >>>Zeeshan Siddique Sana Malik Joined NCP: भाजपचे माजी दोन खासदार नवाब मलिक, बाबा सिद्दिकी यांच्या मुलांना राष्ट्रवादीची उमेदवारी

मित्रपक्षांपासून काँग्रेसला झाकोळू न देता पक्षाची स्वतंत्र ओळख कायम ठेवण्याचे पटोलेंच्या प्रयत्नांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे .राज्य कॉंग्रेसच्या आजवरच्या नेतृत्वाने ही हिंमत दाखवली नव्हती हे येथे उल्लेखनीय.

विदर्भासाठी संघर्ष

विदर्भ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे आणि नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी जागा वाटपाच्या निमित्ताने त्यांचे प्रयत्न दिसून आले. विदर्भातून आलेल्या  पटोलेंना या भागातील राजकीय राजकीय आणि सामाजिक समीकरणचे ज्ञान आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेले यश लक्षात घेता काही जागांवरील मित्र पक्षांचा आग्रह कसा चुकीचा आहे हे सांगण्याचे धाडस पटोले यांनी दाखवले.विदर्भात  आघाडी राखून ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडीसाठीही आव्हान बनली होती  शिवसेनेने (ठाकरे) अधिक जागांची मागणी केल्याने पेच निर्माण झाला होता.

हेही वाचा >>>Raver Assembly Constituency: रावेरमध्ये चौधरी परिवाराची चौथी पिढी राजकारणात; धनंजय चौधरी काँग्रेसचे उमेदवार

परंतु, पटोलेंनी ठाम भूमिका घेत शिवसेनेचा (उबठा)  या भागात फारसा प्रभाव नाही, त्यामुळे काँग्रेसच्या जागा मिळायला हव्यात, असे सुनावले. यामुळे त्यांच्याधर टीका झाली. परंतु  काँग्रेसचा आधार टिकवून ठेवण्यासाठी विदर्भाला केंद्रस्थानी ठेवण्यात  पटोले यशस्वी झाले.

सेनेचा दबाव झुगारला जेव्हा एकत्रित शिवसेना भाजप यांची युती होती, तेव्हा शिवसेनेचा प्रभाव अधिक जाणवत होता आणि भाजपवर आघाडी टिकवून ठेवण्याचं दडपण होतं. परंतु, पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला काँग्रेसकडून विरोधाचा सामना करावा लागत आहे.