नागपूर : संजय राऊतांनी जागावाटपाच्या विषयावर बोलणे बंद करून विरोधकांवर तोफ डागली पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ते सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पटाले म्हणाले, शिवसेनेला (उद्धव ठाकरे) नागपूर विभागात केवळ एक जागा मिळाली म्हणून संजय राऊत नाराजी व्यक्त करत असतील तर त्यांचे ते वैयक्तिक मत आहे. काँग्रेसला कोकणात काहीच मिळाले नाही, मग आम्ही तेच उगाळत बसायचे का? काँग्रेसने १० ते १२ जिल्ह्यात एकही उमेदवार दिला नाही. उमेदवारी मिळणारे खूश आणि न मिळणारे नाराज होत असतात. भाजपमध्ये तर जागावाटपाबाबत मोठा वाद सुरू आहे. महाराष्ट्र भाजपच्या हाती पुन्हा गेले तर ते महाराष्ट्र विकून महाराष्ट्रावर गुजरातचे नियंत्रण आणतील. महाराष्ट्र वाचवण्यासाठी तडजोड करावी लागेल. राष्ट्रीय पक्ष म्हणून मित्रपक्षांना सांभाळण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. कार्यकर्त्यांच्या वेदनांची कल्पना आहे. पण, आघाडी महत्वाची आहे. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे सांगली ‘पॅटर्न’ कुठेही घडू नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. काही जागांबाबत वाद आहेत. त्यावर उद्या, मंगळवारपर्यंत तोडगा निघेल, असेही पटोले म्हणाले.