नाशिक : दिंडोरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ हेच महायुतीचे उमेदवार राहणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या तटकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी दिंडोरी आणि निफाड येथे मेळावे पार पडले. यावेळी तटकरे यांनी ही घोषणा केली. दिंडोरीतील मेळाव्यात उपसभापती नरहरी झिरवळ यांनी आपल्याविषयी प्रसारमाध्यमातून नाहक वावड्या उठविल्या जात असल्याचे नमूद केले. काही दिवसांपूर्वी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाला होता. दिंडोरी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तो आग्रही आहे. आपल्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात असला तरी आपण सदैव अजित पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचे उपसभापती झिरवळ यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट

हेही वाचा >>>शिंदे गटाचे माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र ठरले ?

सामान्य आदिवासी कार्यकर्त्याला दादांनी विधानसभेचे उपसभापती बनविले. सरकार बदलले, पण आपले पद कायम राहिले. त्यांनी कोट्यवधीचा निधी विकास कामांसाठी आपल्या मतदारसंघात दिल्याचे झिरवळ यांनी सांगितले.

तटकरे यांनी दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय चांगले वातावरण असून एक हजार एक टक्के आपला उमेदवार या मतदारसंघात निवडून येणार असल्याचा दावा केला.

शिंदे गटाचे माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये

काँग्रेसमधून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात आणि तेथून उडी मारत माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीस इच्छुक आहेत. या पक्षांतरामुळे महायुतीमधील जागावाटपाची बोलणी पुढे सरकल्याचे संकेत मिळत आहेत. कन्नड मतदारसंघ सध्या उद्धव ठाकरे यांचे समर्थक उदयसिंह राजपूत यांच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट अशी लढत व्हावी असे संकेत मिळू लागले आहेत. याच मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव हेही प्रचार करत आहेत. त्यामुळे कन्नडची निवडणूक बहुरंगी होईल, असे चित्र निर्माण होत आहे.

Story img Loader